ठरलं एकदाचं..! एसटीचा प्रवास आता महागणार; तब्बल 'इतक्या' रुपयांनी वाढणार भाडे
गेल्या तीन वर्षांपासून एसटीच्या भाड्यात वाढ झालेली नाही. त्यामुळे एसटी महामंडळ आर्थिक संकटांना तोंड देत आहे. नवीन सरकारचा शपथविधी होण्यापूर्वी एसटी महामंडळाने भाडेवाढीचा प्रस्ताव तयार केला आहे. एसटी महामंडळाकडून १४.३ टक्के भावेवाढ करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला असून, आता ज्या प्रवासासाठी शंभर रुपये भाडे लागत होते त्याच प्रवासाला आता ११५ रुपये भाडे द्यावे लागणार आहे.

एसटी महामंडळ आहे अडचणीत
सरकारने महिला, ज्येष्ठ, विद्यार्थी आदींना प्रवासात सवलती दिल्या आहेत. त्यामुळे महामंडळ आर्थिक अडचणीत सापडले असल्याचे बोलले जातेय. गेल्या तीन वर्षांपासून एसटी महामंडळाने भाडेवाढ केलेली नाही. शासनाच्या सवलतीवर एसटीला वेगळे पैसे खर्च करावे लागतात. हे पैसे द्यायलाही एसटी प्रशासनाकडे पैसे नसल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे भाडेवाढ करणे प्रशासनाला अनिर्वाय आहे. आता भाडेवाढीचा निर्णय घेतल्याशिवाय काही पर्याय नाही, असे एसटी महामंडळाचे म्हणणे आहे. एसटीचे राज्य सरकारमध्ये विलनीकरण झाले असते तर ही नामुष्की ओढवली नसती, असे काही एसटी कामगार संघटनांचे म्हणणे आहे.
साडेचौदा टक्के भाडेवाढीचा प्रस्ताव
राज्यात नुकत्याच विधानसभेच्या निवडणुका झाल्या. ज्या महायुती सरकारने महिलांना अर्ध्या भाड्यात प्रवास करण्याची सवलत दिली, तेच आता सत्तेत आले आहे. त्यामुळे ही सवलत कायम राहणार आहे. त्यामुळे एसटी महामंडळावर आर्थिक भार पडणार आहे. त्यामुळे आता येणाऱ्या नवीन सरकारसमोर एसटीच्या भाडेवाढीचा प्रस्ताव ठेवला जाणार आहे. १४.३ टक्के भाडेवाढीचे समर्थन करणारा प्रस्ताव महामंडळ प्रशासनाने तयार केला आहे. यापूर्वी २७ नोव्हेंबर २०२१ रोजी एसटीच्या तिकीट दरात वाढ झाली होती. आता प्रस्तावित १४.३ टक्के भाडेवाढी झाली तरच एसटी महामंडळाचा तोटा भरुन निघणार आहे, असेही सांगितले जाते.
भाडेवाढ होईल का, याबाबत शंकाच
एसटी महामंडळाने प्रस्ताव तयार करुन शासनाकडे पाठवला आहे. आता महायुतीचे सरकार तो मान्य करते की फेटळून लावते, याकडे लक्ष लागले आहे. सत्तेवर येताच जनतेला भाडेवाढीची भेट नवीन सरकार देणार का, हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होणार आहे. परंतु काही विश्लेषकांच्या मते सरकार सत्तेत आल्याबरोबर एवढी भाडेवाढ करणार नाही, असे काहींचे म्हणणे आहे. दुसरीकडे सरकारच्या सवलती कायम सुरु ठेवायच्या असतील, तर भाडेवाढीशिवाय पर्याय नाही, असेही बोलले जाते.












Click it and Unblock the Notifications