Solapur News : सोलापूर हादरले! इन्स्टाग्रामवर भावनिक स्टोरी ठेवत 18 वर्षीय तरुणाची आत्महत्या!

Solapur Crime News : सोलापूर शहरातील सुशील नगर, विजापूर रोड परिसरात एका १८ वर्षीय तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. योगेश अशोक ख्यागे असे आत्महत्या केलेल्या या तरुणाचे नाव आहे. या घटनेमुळे संपूर्ण सोलापूर शहरात हळहळ व्यक्त होत आहे.

आत्महत्येपूर्वीची भावनिक इन्स्टाग्राम स्टोरी!

टोकाचे पाऊल उचलण्यापूर्वी योगेशने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक भावनिक स्टोरी अपलोड केली होती. या स्टोरीमध्ये त्याने आपल्या मनातील वेदना आणि इच्छा व्यक्त केली होती. "मरायच्या आधी सर्वांच्या मनातून उतरून जायचं आहे मला, जेणेकरून मी मेल्यानंतर कोणी माझी आठवण नाही काढली पाहिजे..!!" अशा आशयाची ही स्टोरी होती, जी त्याच्या मानसिक स्थितीवर प्रकाश टाकते आणि 'त्याने हे पाऊल का उचलले असावे' याबद्दल प्रश्न निर्माण करते.

Solapur Tragedy

घटनेचा तपशील

घटनेच्या वेळी योगेशचे आई-वडील नातेवाईकांकडे गेले असल्याने तो घरात एकटाच होता. ही संधी साधून योगेशने गळफास घेतला. काही वेळाने नातेवाईकांच्या ही बाब लक्षात आल्यावर त्यांनी योगेशला बेशुद्ध अवस्थेत खाली उतरवले आणि तात्काळ उपचारांसाठी सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर योगेश ख्यागे याला मयत घोषित केले. योगेश हा एका बेकरी दुकानात काम करत होता, तर त्याचे वडील वॉचमन म्हणून काम करतात. योगेशने आत्महत्या करण्यामागचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून, सोलापूर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+