Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Solapur Accident News : कासपठार पाहायला जाणं जीवावर बेतलं!कार-टेम्पोची धडक मायलेकरासह 4 ठार, 3 जखमी

Solapur Accident News : कासपठार पाहायला जाणं जीवावर बेतलं असून कार आणि टेम्पोचा भीषण अपघात होऊन मायलेकरासह 4 जण ठार झाले आहेत तर 3 जण गंभीर जखमी झाले. हा अपघात सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील कारुंडे गावानजिक आज दुपारी दीडच्या सुमारास घडला.

पंढरपूर फलटण मार्गावरील कारुंडे नातेपुते ता माळशिरस येथील पुलावर दुपारी एक ते दीडच्या सुमारास टेम्पो आणि कारमध्ये हा अपघात झाला. हा अपघात एवढा भीषण होता की, चौघांचा जागीच मृत्यू झाला. इतर तीनजण जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे.

Solapur Accident News

माय लेकराचा मृतात समावेश

या अपघातात चौघांचा मृत्यू झाला त्यात आई आणि मुलांचा समावेश असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. दोघांचाही एकाच क्षणी अपघातात मृत्यू झाल्याने त्यांच्या कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे.

असा झाला अपघात अन् मृतांची नावे

पोलिस सुत्रांकडून प्राप्त माहितीनुसार, लासुर्णे तालुका इंदापूर येथील राजेश शहा हे आपल्या कामगारांना घेवून सातारा येथील कासपठार पाहण्यासाठी निघाले होते. त्यांची गाडी कारुंडे नातेपुते तालुका माळशिरस येथील पुलावर आली. त्यावेळी टम्पोला ही गाडी धडकली. यामध्ये राजेश अनिल शहा (वय 55 वर्ष), दुर्गेश शंकर घोरपडे (वय 28 वर्ष), कोमल विशाल काळे (वय 32 वर्ष) तर शिवराज विशाल काळे (वय वर्ष 10) हे जागीच ठार झाले आहेत.

हे झाले अपघातात जखमी

या अपघातामध्ये आकाश लोंढे, पल्लवी पाटील, अश्विनी घोरपडे, हे तीनजण जखमी झाले आहेत.अपघाताची माहिती मिळताच सोलापूर ग्रामीण पोलिस दलाचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहचले आहेत. ते घटनास्थळी तपास करत असून अपघाताची कारणे समजून घेत आहेत.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+