अबब..! निवडणुकीच्या धामधुमीत व्हॅनमध्ये सापडल्या 6.50 टन चांदीच्या विटा; नेमका माल कुणाचा?
Mumbai Crime News : विक्रोळी पोलिसांनी व निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने आज मुंबईत मोठी कारवाई केली आहे. एका कॅश व्हॅनमध्ये चक्क साडे सहा टन चांदीच्या विटा सापडल्याने खळबळ उडाली आहे. करोडो रुपयांच्या किमतीच्या चांदीच्या विटा सापडल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, या चांदीच्या विटा मुलुंडमधील एका गोदामामध्ये ब्रिंक्स या कंपनीच्या गाडीतून ठेवण्यासाठी चालवल्या होत्या. या विटा अधिकृत असल्याची माहिती समोर आली असली तरी देखील निवडणूक आयोगाचे पथक, इन्कम टॅक्स व मुंबई पोलिस पुढील तपास करत आहेत.

यापूर्वी सुमारे दीड कोटींचा मुद्देमाल जप्त
मुंबईत यापूर्वीही भुलेश्वरमध्ये देखील 1 कोटी 32 लाख रुपयांचा मुद्देमाल सापडला होता. याप्रकरणी पोलिसांनी 5 जणांना ताब्यात घेतलं होतं. याचाही तपास पोलिसांनी सुरु केला होता. शिवाय पुण्यात देखील दोन ठिकाणी पोलिसांनी मोठं घबाड जप्त केलं होतं. पुण्यात रोकड नेण्यासाठी आरोपींकडून कारचा वापर करण्यात आला होता. आता मुंबईतील भुलेश्वर प्रकरणात पाच लोक संशयितरित्या बॅग घेऊन जात होते. भुलेश्वरसारख्या वर्दळीच्या ठिकाणाहून लोक कुठे जात होते.याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.
खेडमधून 5 कोटी जप्त
मुंबई-बेंगळुरू महामार्गावरील खेड-शिवापूर प्लाझाजवळ पोलिसांच्या नाकाबंदीदरम्यान पोलिसांनी बेहिशेबी रोकड जप्त करण्यात केली होती. चालकासह कारमध्ये प्रवास करणाऱ्या चार जणांची चौकशी करण्यात आली. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली होती. दरम्यान, कारमधील शहाजी नलावडे हे शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील यांचे सहकारी असल्याची चर्चा होती. त्यावर महाराष्ट्रात चांगलंच आरोप प्रत्यारोपाचं राजकारण सुरू झालं होतं.












Click it and Unblock the Notifications