कलाविश्वाला धक्का ! राहुल देशपांडे यांचा संसार मोडला; लग्नाच्या १७ वर्षांनंतर पत्नीपासून विभक्त
राष्ट्रीय पुरस्कार विजेते सुप्रसिद्ध गायक राहुल देशपांडे सध्या त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील एका महत्त्वाच्या निर्णयामुळे चर्चेत आले आहेत. त्यांच्या मधुर आवाजाने रसिकांच्या मनात घर केले आहे. आता त्यांनी लग्नाच्या १७ वर्षांनंतर त्यांची पत्नी नेहापासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय दोघांनीही परस्पर संमतीने घेतला असून, त्यांनी सोशल मीडियावर एक भावूक पोस्ट शेअर करत ही माहिती दिली आहे.

राहुल देशपांडे यांनी दिली माहिती
राहुल देशपांडे यांनी आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर करून ही बातमी दिली. त्यांनी लिहिले आहे की, "प्रिय मित्रांनो, तुमच्यापैकी प्रत्येकाने माझ्या आयुष्याच्या प्रवासात एक महत्त्वाचा भाग निभावला आहे आणि म्हणूनच मला तुमच्यासोबत एक वैयक्तिक आणि महत्त्वाचे अपडेट शेअर करायचे आहे."
त्यांनी पुढे म्हटले, "१७ वर्षांच्या वैवाहिक जीवनानंतर आणि अगणित सुंदर आठवणींनंतर, मी आणि नेहाने परस्पर संमतीने वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे आणि आम्ही आपापले आयुष्य स्वतंत्रपणे पुढे जगत आहोत. आमचे कायदेशीर विलगीकरण सप्टेंबर २०२४ मध्ये पूर्ण झाले."
मुलीसाठी कायम एकत्र
राहुल देशपांडे यांनी त्यांच्या पोस्टमध्ये विशेषतः त्यांची मुलगी रेणुका हिच्या भविष्याबद्दल काळजी व्यक्त केली आहे. त्यांनी लिहिले की, "मी ही माहिती तुमच्यासोबत शेअर करण्यापूर्वी काही वेळ घेतला, जेणेकरून या बदलाच्या प्रक्रियेला मी खाजगीरित्या हाताळू शकेन आणि सर्व गोष्टींची व्यवस्थित काळजी घेतली जाईल, विशेषतः आमची मुलगी रेणुका हिच्या हिताची. ती माझ्यासाठी सर्वात महत्त्वाची आहे आणि मी नेहा सोबत तिच्यासाठी अखंड प्रेम, साथ आणि स्थैर्य देण्यास कटिबद्ध आहे."
या पोस्टमधून राहुल देशपांडे यांनी पालक म्हणून असलेले त्यांचे नाते आणि एकमेकांबद्दल असलेला आदर आजही कायम असल्याचे स्पष्ट केले. त्यांनी आपल्या चाहत्यांना आणि मित्रांना या निर्णयाचा आदर करण्याचे आवाहन केले आहे.
कलाविश्व आणि चाहत्यांना धक्का
राहुल आणि नेहा देशपांडे यांच्या या निर्णयामुळे त्यांच्या चाहत्यांना आणि संगीत क्षेत्रातील अनेकांना धक्का बसला आहे. हे दोघेही अनेक वर्षांपासून एकत्र होते आणि त्यांच्या वैवाहिक जीवनाचे सूर अचानक बिघडल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. त्यांच्या या पोस्टवर अनेकांनी दु:ख व्यक्त केले असून, त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला या कठीण काळात धीर देण्याचा प्रयत्न केला आहे. राहुल देशपांडे यांनी त्यांच्या पोस्टमध्ये ही त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील एक नवीन अध्याय असल्याचे म्हटले आहे. यापुढेही ते एक चांगले पालक म्हणून रेणुकाची जबाबदारी स्वीकारणार आहेत, हे त्यांच्या पोस्टवरून स्पष्ट होते.












Click it and Unblock the Notifications