Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Dasara Wishesh : दसऱ्यानिमित्त आपल्या नातेवाईक, मित्र आणि प्रियजनांना खास मराठीतून शुभेच्छा पाठवा

Dasara Wishesh 2024 : हिंदू धर्मातील महत्वाच्या सणापैकी एक असलेला दसरा या सणाला फार महत्व आहे. हिंदू पंचांगानुसार अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या दशमीला दसरा हा सण साजरा केला जातो. आश्विन महिन्याच्या पहिल्या दिवसापासून नऊ दिवस नवरात्री असते. त्यानंतरचा दहावा दिवस म्हणजेच 'दसरा'. या सणाला विजयादशमी असंही म्हटलं जातं.

या वर्षी 12 ऑक्टोबर रोजी दसरा सण साजरा केला जात आहे. हा सण वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक मानला जातो. साडेतीन मुहुर्तांपैकी एक असणार्‍या दसर्‍याच्या दिवशी आपट्याचे पानं म्हणजेचं सोनं एकमेंकांना देऊन हा सण देशभरात साजरा केला जातो. तर या शुभ दिवशी नवीन लोक सोनं ही खरेदी करतात.

Dasara Wishesh 2024

विजयादशमीच्या दिवशी भगवान राम यांनी रावणाचा वध करुन विजय मिळवला होता. तसेच या दिवशी रावणाचा पुतळा तयार करुन त्याचे दहन केले जातं. नवरात्र उत्सवाचा शेवटच्या दिवशी दसऱ्याचा दिवस असल्याने देवीचे विसर्जन दसरा झाल्यानंतर केले जाते. रावणाचा पुतळा दहन करताना प्रत्येकजण वाइट गोष्टींचा अंत करुन चांगल्या मार्गावर जाण्याचा संकल्प करतात. या खास दिवशी आपल्या जवळच्या लोकांना, मित्र-मैत्रिणींना आणि नातेवाईकांना विजयादशमी, दसऱ्यानिमित्त द्या मराठी भाषेतून शुभेच्छा द्या.

"आपट्याची पान, झेंडूची फुल
घेऊन आली विजयादशमी
दसऱ्याच्या शुभ दिनी
सुख, समृद्धी नांदो तुमच्या जीवनी"

"जल्लोष विजयाचा..
साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त
सण हा दसऱ्याचा.
दसऱ्याच्या मनपूर्वक शुभेच्छा"

"सुख, समृद्धी, शांती आणि
यशाच्या शुभेच्छांसह,
दसऱ्याच्या पवित्र
सणाच्या हार्दिक शुभेच्छा."

"हिंदू संस्कृती हिंदुत्व आपली शान
सोने लुटून साजरा करू दसरा
आणि वाढवू महाराष्ट्राची शान."

"आपट्याच्या पानांची
होते देवाणघेवाण..
प्रेमाचा ओलावा
करुनि दान..
शुभ दसरा..!"

"दसऱ्याचा हा पवित्र सण
तुमच्या घरात अपार आनंद आणो
भगवान श्रीराम तुमच्यावर व
तुमच्या परिवारावर
सुखाचा वर्षाव करोत
दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा"

"आला आला दसरा,
दुःख आता विसरा
चेहरा ठेवा हसरा,
साजरा करु दसरा..
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा"

"आंब्याच्या पानांची केली कमान
अंगणात काढली रांगोळी छान
अश्विन शुद्ध दशमीचा सण दसरा
आपट्याची पाने देऊन करुयात साजरा..
दसऱ्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!"

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+