Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

धक्कादायक ! लोणावळ्याच्या भुशी धरण परिसरात 5 जण बुडाले, 2 मृतदेह बाहेर काढण्यात यश

पुणे: पावसाळ्यात लोणावळा शहरानजिक असणारे भुशी धरण पर्यटकांना चांगलीच भुरळ घालते. पावसाळ्यात पर्यटक या परिसरात मोठी गर्दी करतात. परंतु आता या ठिकाणावरून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.

लोणावळ्यात पावसाळी पर्यटनासाठी गेलेल्या एका कुटुंबातील पाच जण भुशी डॅममध्ये वाहून गेल्याची घटना घडली आहे. यामध्ये 4 लहान मुले आणि 1 महिला यांचा समावेश आहे. हे सर्वजण पुण्यातील रहिवासी असल्याची माहिती समोर येत आहे. भुशी धरणाच्या पाठीमागे असलेल्या डोंगरातील धबधबा पर्यटकांना विशेष भुरळ घालतो.

5 people drowned in bhushi dam

रेल्वे वॉटर फॉल परिसरात अन्सारी कुटुंब वर्षाविहाराचा आनंद लुटत होते. पाय घसरुन हे सर्वजण वाहून गेल्याचं सांगण्यात येत आहे. धबधब्याचे पाणी भुशी धरणात येते. त्यामुळे तिथे पाच जणांच्या शोधकार्याला सुरुवात झाली आहे. यामधील 2 मृतदेह हाती लागले आहेत.

आता भुशी धरणात शिवदूर्ग मित्र परिवार आणि शहर पोलिसांच्या मदतीने शोधमोहिम राबवली जात आहे. स्थानिक प्रशासन आणि आपत्कालीन दल देखील येथे दाखल झाले आहे. शोधमोहिम जलदगतीने सुरू असल्याचं समजतं आहे. प्रगत उपकरणे आणि तंत्रज्ञानाचा वापर केला जात असून, उर्वरित 3 मृतदेह शोधले जात आहेत.

पावसाळ्यात घ्या काळजी

या घटनेवरून तुमचा निष्काळजीपणा जीवावर बेतू शकतो हे अधोरेखित झाले आहे. त्यामुळे पावसाळी पर्यटनासाठी धरण, तलाव, धबधबा परिसरात जाताना आपण विशेष काळजी घेण्याची गरज आहे हे स्पष्ट झालंय. लहान मुले सोबत असल्यास खोल पाण्याच्या परिसरात जाणे टाळले पाहिजे.

त्याचबरोबर आपण वाहनाने घाट स्त्याने प्रवास करत असला तर दरड कोसळण्याची भीती असते. अशावेळी सुरक्षित मार्गाचा आपण अवलंब केला पाहिजे. तसेच वाहनांची तांत्रिक परिस्थिती देखील तपासून पहिली पाहिजे. तसेच शक्यतो दुचाकी प्रवास टाळावा. अशावेळी नसते धाडस जीवावर बेतू शकते. त्यामुळे आपली आणि आपल्या कुटुंबाची योग्य काळजी आपण घेतली पाहिजे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+