वाजत गाजत,गुलाल उधळत या..', ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्याचा टीजर प्रदर्शित!
मुंबई : राज्यातील चार महत्ताचे नेते यावर्षी दसरा मेळावा घेत आहेत. त्यात उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मराठा आंदोलक मनोज जरांगे आणि ओबीसी नेत्या पंकजा मुंडे यांचा समावेश आहे. हे सर्व नेते वेगवेगळ्या पक्षातले असल्याने या चौघांच्याही दसरा मेळाव्याची तयारी मोठ्या धुमधडाक्यात सुरु आहे. त्यातल्या त्यात उद्धव ठाकरे व एकनाथ शिंदे यांच्या मुंबईतील दसरा मेळाव्याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. आज ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्याचा टिजर प्रदर्शित झाल्याने चर्चा वाढली आहे.
ठाकरेंची तोफ धडाडणार शिवतीर्थावर
दरवर्षीप्रमाणे यंदाही शिवसेना उबाठा गटाचा दसरा मेळावा शिवाजी पार्क येथे आयोजित करण्यात येणार आहे. यावर्षी ठाकरे गटाकडून दसरा मेळाव्याची जोरदार तयारी करण्यात आली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर व शिवसेनेत फूट पडल्यामुळे यंदाचा ठाकरे गटाचा दसरा मेळावा अत्यंत महत्वाचा मानला जात आहे. अश्यातच आता ठाकरे गटाकडून यंदाच्या दसरा मेळाव्याचा टीजर प्रदर्शित करण्यात आला आहे.

ट्विटरवरुन प्रदर्शित झाला टिजर
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या अधिकृत 'X' अकाउंटवरून बुधवारी हा टीजर प्रदर्शित करण्यात आला. यात 'वाजत गाजत, गुलाल उधळत या!' असे आव्हान शिवसैनिकांना करण्यात आले. या टीजरमध्ये सुरुवातीला फटाक्यांची आतिषबाजी, ढोल ताशांचा गजर तसेच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा व्यासपीठावर उभा असलेला पाठमोरा फोटो पाहायला मिळतो. यात पुढे उद्धव ठाकरे म्हणतात, जर विरोधकांना वाटत असेल कि शिवसेना संपली, त्यांना मला दाखवायचे आहे शिवसेना काय करू शकते." या टीजरबरोबर कॅप्शनमध्ये "वाजत गाजत, गुलाल उधळत या' असे आवाहन शिवसैनिकांना करण्यात आले आहे.
टिजरवर लाईक व रिट्विटचा पाऊस
टीजरमध्ये शिवतीर्थावरील दसरा मेळाव्यातील शिवसैनिकांचा माहोल दाखवण्यात आला असून "शिवगर्जना महाराष्ट्र हितासाठी, महाराष्ट्राच्या रक्षणासाठी, महाराष्ट्रधर्म राखण्यासाठी, ताकद निष्ठावंतांची, परंपरा करारी बाण्याची, शिवतीर्थावर धगधगणार मशाल ठाकरेंची! वाजत गाजत, गुलाल उधळत या!" असे आवाहन टीजरमधून शिवसैनिकांना करण्यात आले आहे. सोशल मीडियावर हा टिजर मोठ्या प्रमाणात शेअर होत असून, त्यावर लाईक्स आणि रिट्विटचा पाऊस पडताना दिसत आहे. यंदाही मुंबई महानगरपालिकेकडून उबाठा गटाला दसरा मेळाव्याची परवानगी मिळाली आहे. त्यामुळे यंदाही दसरा मेळाव्याला शिवतीर्थवर ठाकरेंचा आवाज घुमणार आहे.
दसरा मेळावा
— ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) October 9, 2024
वाजत गाजत, गुलाल उधळत या!
शनिवार, दि. १२ ऑक्टोबर २०२४
सांयकाळी ५ वाजता. शिवतीर्थ, दादर(प), मुंबई. pic.twitter.com/Qz1SZhqXFD












Click it and Unblock the Notifications