Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

गडचिरोलीत शिंदे गटातील गटबाजी शिगेला: दोन जिल्हाप्रमुखांमध्ये राडा, नेमकं काय घडलं?

Gadchiroli shivsena clash : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जसजशा जवळ येत आहेत, तसतशी राजकीय गटबाजी पुन्हा एकदा उफाळून येत आहे. महाराष्ट्राचे शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या गडचिरोली जिल्हा दौऱ्यादरम्यान, शिंदे गटातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला. दोन जिल्हाप्रमुखांमधील वाद इतका विकोपाला गेला की त्याचे रूपांतर मारामारीत झाले, ज्यामुळे पक्षीय एकतेला मोठा धक्का बसला आहे.

ShivSena Shinde

मंत्र्यांच्या दौऱ्यानंतर राडा

शिवसेना नेते आणि शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी गडचिरोली येथे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीला जिल्ह्यातील बहुतांश शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते. मात्र, बैठक संपल्यानंतर आणि मंत्री चंद्रपूरकडे रवाना झाल्यानंतर, गडचिरोली जिल्हाप्रमुख संदीप ठाकूर आणि अहेरी जिल्हाप्रमुख राकेश बेलसरे यांच्यात जोरदार वाद सुरू झाला. हा वाद सुरुवातीला शाब्दिक बाचाबाचीपुरता मर्यादित होता, पण नंतर त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. या प्रकारामुळे उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ उडाला आणि स्थानिक नागरिकांना मध्यस्थी करून त्यांना शांत करावे लागले.

श्रेयवादावरून वाद

हा वाद प्रामुख्याने श्रेयवादावरून सुरू झाल्याचे सांगण्यात येत आहे. मंत्र्यांच्या दौऱ्याचे श्रेय घेण्यावरून दोन्ही जिल्हाप्रमुखांमध्ये मतभेद होते, जे नंतर भर सर्किट हाऊसमध्ये समोर आले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असताना अशा प्रकारची गटबाजी समोर आल्याने पक्षाला मोठा फटका बसू शकतो, असा राजकीय जाणकारांचा अंदाज आहे. यामुळे पक्षात फूट पडण्याची आणि कार्यकर्त्यांमध्ये नाराजी वाढण्याची शक्यता आहे.

दादा भुसे यांच्या दौऱ्यातील दुसरी घटना

दरम्यान, दादा भुसे यांच्या गडचिरोली दौऱ्यात आणखी एक दुर्दैवी घटना घडली. गडचिरोली-नागपूर मार्गावरील काटली गावात एका भरधाव ट्रकने व्यायाम करणाऱ्या सहा मुलांना चिरडले. या घटनेत चार मुलांचा जागीच मृत्यू झाला, तर इतर दोघांना उपचारांसाठी नागपूर येथे हलवण्यात आले आहे.

या घटनेनंतर संतप्त गावकऱ्यांनी तब्बल पाच तास रस्ता रोखून धरला. शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत गावकऱ्यांची समजूत काढली. त्यांच्या मध्यस्थीनंतर वाहतूक सुरळीत झाली, पण या अपघातामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

एकीकडे मंत्री अपघातग्रस्तांच्या मदतीला धावून जात असताना, त्याच वेळी त्यांच्याच पक्षातील दोन प्रमुख पदाधिकाऱ्यांमधील गटबाजी आणि वाद विकोपाला पोहोचल्याने राजकीय वर्तुळात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत

More From
Prev
Next
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+