Shivendra Raje Bhonsle biography : शिवेंद्रराजेंनी घेतली मंत्रीपदाची शपथ
Shivendra Raje Bhonsle biography : शिवेंद्रराजे भोसले हे भाजपचे आमदार आहेत. महायुतीच्या मंत्रीमंडळ विस्तारात मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. अजिंक्यतारा सहकारी बँकेचे ते अध्यक्षही आहे. या बँकेच्या अध्यक्षपदानंतरच त्यांचा खऱ्या अर्थाने राजकीय प्रवास सुरु झाला.
अभयसिंहराजे भोसले यांच्या निधनानंतर ते राजकारणात सक्रीय झाले. त्यानंतर २००४ मध्ये ते राष्ट्रवादीच्या तिकीटावर विधानसभेत निवडून गेले. २००४ पासून सलग तीन वेळा ते राष्ट्रवादीचे आमदार राहिले. त्यानंतर त्यांनी २०१९ मध्ये त्यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपात प्रवेश केला. त्यानंतर भाजपच्या तिकीटावर ते निवडून आले.

यावेळी केली रेकाँर्डब्रेक कामगिरी
सातारा-जावळी विधानसभा मतदारसंघात आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या मताधिक्याकडे सर्वाचे लक्ष लागले होते. यावेळी अपेक्षेप्रमाणे त्यांनी राज्यात नंबर एकच्या मताधिक्याने विजय मिळवला. शिवेंद्रसिंहरजेनी एक लाख ७५ हजार ६२ मते मिळवली. या मतदारसंघात त्यांनी उद्धव ठाकरे शिवसेनेच्या अमित कदमांचा पराभव केला. शिवेंद्रराजे हे १ लाख ४० हजार १२० मतांनी निवडून आले.

वडिलांच्या पावलावर पाऊल
शिवेंद्रराजे भोसले यांचे वडील अभयसिंहराजे भोसले यांनी जनता पक्षाच्या तिकीटावर १९७८ साली सातारा-जावळी मतदारसंघात विजय मिळवला होता. त्यानंतर १९८० पासून ते १९९५ पर्यंत लागोपाठ चार वेळा ते या ठिकाणी निवडून आले होते. त्यानंतर वडिलांऐवजी शिवेंद्रराजे स्वतः या मतदारसंघातून उभे राहिले. १९९८ च्या पोटनिवडणुकीत उदयनराजे भोसले यांनी भाजपच्या तिकीटावर येथून विजय मिळवला. १९९९ मध्ये अभयराजेंनी या मतदारसंघात पुनरागमन केले. त्यानंतर २००४ पासून शिवेंद्रराजे भोसले या ठिकाणी कायम जिंकत आले आहेत.
दोन्ही राजे आले एकत्र
खासदार उदयनराजे व आमदार शिवेंद्रसिंहराजे हे साताऱ्याच्या राजकीय पटलावरचे कट्टर विरोधक समजले जात होते. गेल्या चार वर्षांपासून दोघेही भाजपच्या गोटात सामील झाले आहेत. मात्र, सातारा नगरपालिकेतील राजकारणाच्या दुखऱ्या राजकीय संदर्भाने दोन्ही राजे एकमेकांचे गेल्या आठ वर्षांपासून कट्टर विरोधक असून, एकमेकांवर आरोप करण्याची एकही संधी सोडत नव्हते. मात्र, गेल्यावर्षी भाजपच्या शिवतीर्थ येथे आयोजित कार्यक्रमात दोन्ही राजेंमध्ये सुखद संवाद दिसून आला. तेव्हापासून हे दोन्ही राजे भाजपसोबत व एकमेकांसोबत असल्याचे लोकसभा व विधानसभेलाही दिसले. त्यामुळेच शिवेंद्रराजेंना यावेळी विक्रमी मताधिक्य मिळाले.
शिवेंद्रराजेंना मंत्रीपदाची संधी
विधानसभा निवडणुकींनतर भाजप नेते शिवेंद्रराजे भोसले यांना मंत्रिपद मिळावं यासाठी खासदार उदयनराजे भोसले यांनी महायुतीच्या नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या. आता भाजपकडून मंत्रिपदासाठी शिवेंद्रराजे भोसले यांचं नाव निश्चित झालं. शिवेंद्रराजे भोसले मंत्रिपदाच्या माध्यमातून राजकारणातील नव्या इनिंगला सुरुवात करत आहेत. शिवेंद्रराजे सातारा विधानसभेतून सलग पाचव्यांदा व भाजपकडून दुसऱ्यांदा विजयी झाले आहेत.












Click it and Unblock the Notifications