Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

मुघलांनीही शिवरायांचा असा अपमान केला नव्हता... मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, संजय राऊतांचा हल्ला

मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमधील असणाऱ्या राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज स्मारक बांधण्यात आले. 4 डिसेंबर 2023 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते स्मारकावरील महाराजांच्या पूर्णकृती पुतळ्याचे अनावरण झाले, मात्र काल हा पुतळा कोसळला. आठच महिन्यांत पुतळा कोसळ्याने विरोधकांनी सरकारला धारेवर धरले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी शिवसेना (उबाठा) नेते संजय राऊत यांनी मुंबईत पत्रकार परिषदेदरम्यान केली आहे.

संजय राऊत म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा कोसळला. त्यामुळे अख्खा महाराष्ट्र दु:खात आहे. पण शिंदे सरकारच्या चेहऱ्यावर वेदना दिसत नाही. छत्रपती शिवाजी महाराज ज्यांचे लाडके होऊ शकले नाहीत, ते लाडकी बहीणीच्या गोष्टी करतात, समुद्रावर वारा असल्याने पुतळा कोसळला, असं सरकारकडून सांगतले जात आहे, हे हास्यास्पद आहे. समुद्रावर वारा नाहीतर काय असणार? असा प्रश्न संजय राऊत यांनी केला आहे.

Sanjay Raut

मुघलांनीही शिवरायांचा असा अपमान केला नव्हता

राउत पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान हा महाराष्ट्र सहन करणार नाही. मुघलांनीही महाराष्ट्रावर अनेकदा आक्रमणे केली, पण शिवरायांचा असा अपमान मुघलांनीही केला नव्हता. तो अपमान काल संपूर्ण देशाने पाहिला. आग्र्यातून छत्रपती स्वाभिमानाने सुटून बाहेर आले. पण काल आपल्याच महाराष्ट्रात कोसळून पडण्याची वेळ त्यांच्यावर आली. याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे जबाबदार आहेत.

लोकमान्य टिळकांच्या पुतळ्याचे दिले उदाहर

संजय राऊत यांनी यावेळी मुंबईतील गिरगाव चौपाटीवर उभारेल्या लोकमान्य टिळकांच्या पुतळ्याचे उदाहरण दिले. ते म्हणाले की,1993 साली गिरगाव चौपाटीवर लोकमान्य टिळकांचा पुतळा बसवण्यात आला. रघुनाथ फडके यांनी पुतळा खंबीरपणे उभा केला होता. तिथेही तोच वारा, त्याच वेगाने वाहतो, तीच हवा आहे. लोकमान्य टिळकांचा पुतळा तेव्हापासून आजपर्यंत तसाच उभा आहे.

पुतळ्याचे काम करणारे मुख्यमंत्र्यांच्या जवळचे

राऊत म्हणाले की, सार्वजनिक बांधकाम विभागाकडून हे काम झाले आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या जवळच्या लोकांना काम दिले. या प्रकल्पाचे ठेकेदार, शिल्पकार सगळे ठाण्यातले आहेत. ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+