Shiv jayanti 2026 wishes शिवतेजाचा जागर! शिवजयंतीनिमित्त प्रियजनांना पाठवा 'या' खास मराठी शुभेच्छा
Shiv jayanti 2026 wishes in marathi : महाराष्ट्राचे आराध्य दैवत, रयतेचा राजा युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती १९ फेब्रुवारी रोजी संपूर्ण राज्यात आणि देशात मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. 'छत्रपती शिवाजी महाराज की जय' आणि 'जय भवानी जय शिवाजी'च्या जयघोषाने अवघा महाराष्ट्र आतापासूनच दुमदुमून गेला आहे. गड-किल्ल्यांपासून ते गल्लीपर्यंत प्रत्येक शिवभक्त महाराजांच्या स्मृतीत तल्लीन झाला आहे.
या विशेष दिनी आपल्या मित्र-परिवाराला आणि नातेवाईकांना डिजिटल शुभेच्छा देऊन शिवजयंतीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी आम्ही काही खास संदेश निवडले आहेत.

शिवजयंती २०२५ खास शुभेच्छा संदेश (Shiv jayanti 2026 wishes in marathi)
प्रौढ प्रताप पुरंदर
क्षत्रिय कुलावतंस
सिंहासनाधी श्वर
महाराजाधिराज महाराज
श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय!
शिवजयंतीच्या सर्वांना मन:पूर्वक शुभेच्छा!
अंधार फार झाला आता दिवा पाहिजे
अफजल खान फार झाले
आता एक जिजाऊंचा शिवा पाहिजे
शतकांच्या यज्ञातून उठली एक ज्वाला
दाही दिशांच्या तेजातून अरुणोदय झाला!
शिवजयंतीच्या शिवमय शुभेच्छा!
इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर
मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर
राज्य करणारा राजा म्हणजे
राजा शिवछत्रपती यांना मानाचा मुजरा!
शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
जगातील एकमेव राजा असा आहे
ज्याचा जन्म आणि मृत्यू किल्ल्यावरच झाला
तो राजा म्हणजेच छत्रपती श्री शिवाजी महाराज.
शिव जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा !
किती राजे आले आणि किती राजे गेले
पण तुमच्या सारखे कोणी नाही...
छत्रपती शिवाजी महाराज की जय!
शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा!
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक,
महाराष्ट्राची आण बाण शान
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या
जयंतीनिमित्त सर्व शिवभक्तांना
शिवमय शुभेच्छा!
प्राणपणाने लढून राजा तूच जिंकले किल्ले,
शत्रूंना सदा परतून तूच लावले हल्ले
धर्म रक्षणा तूच घेतला जन्म जिजाऊ पोटी,
हे शिवराय प्रणाम तुजला कोटी-कोटी.
शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा !
ताठ होतील माना..
उंच होतील नजरा...
या रयतेच्या राजाला..
मानाचा मुजरा.
शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा !
नाही जातीपातीत अडकला माझा दैवत होता उदार
अठरा पगड जाती हाताशी दिले मावळा नाव शूर-वीर
शिवजयंतीच्या शिवमय शुभेच्छा!
श्वासात रोखूनी वादळ, डोळ्यांत रोखली आग
देव आमचा छत्रपती, एकटा मराठी वाघ
शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
शिवजयंती विशेष प्रेरणादायी कोट्स (Shivaji Maharaj Quotes in Marathi)
- "देहाने झाला तरी विचाराने कधीच मरत नाही, तोच खरा 'राजा' असतो."
- "शत्रू कितीही मोठा असला तरी फरक पडत नाही, तुमच्यात त्याला हरवण्याची हिंमत आणि रणनीती पाहिजे."
- "स्वराज्य हे माझे मंदिर आहे आणि शिवराय हे माझे दैवत!"
- "मृत्यू समोर असला तरीही जो घाबरत नाही आणि स्वराज्यासाठी लढत राहतो, तोच खरा मावळा."
- "तळपती तलवार, वाघाची चाल आणि जिजाऊंचे संस्कार... हेच आहे शिवछत्रपतींच्या नावाचं धार!"












Click it and Unblock the Notifications