Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

कसे निवडून येत नाही ते बघतो, शरद पवारांची स्टाईल आली चर्चेत

मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार काल साताऱ्यात होते. तेथील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना त्यांनी मार्गदर्शन केलं. आगामी विधानसभेबाबत मोर्चेबांधणी केली. कार्यकर्त्यांना बुस्टर डोस दिले.

याच कार्यक्रमात शरद पवारांची स्टाईल जरा आक्रमक वाटली. तुम्ही एकत्र रहा. कसे निवडून येत नाही ते मी बघतो, म्हणत त्यांनी विधानसभेचं रणशिंग फुंकलं.

sharad pawar satara visit

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांना तीन महिन्यांचा कालावधी शिल्लक राहिलाय. त्या अनुषंगाने सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. काल म्हणजे रविवारी शरद पवार सातारा दौऱ्यावर होते.

यावेळी पदाधिकाऱ्यांशी झालेल्या बैठकीनंतर त्यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. या कार्यक्रमात शरद पवारांनी काही महत्त्वाच्या राजकीय मुद्द्यांवर भाष्य केलं. लोकसभेला शरद पवार गटाचे ८ खासदार निवडून आल्यामुळे त्यांची महाराष्ट्रातील ताकद वाढली आहे.

या पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणुकांसाठी महाविकास आघाडी सर्व ताकद पणाला लावण्याची शक्यता आहे. त्यात शरद पवारांनी साताऱ्यात केलेलं विधान चर्चेचा विषय ठरलं आहे.

शरद पवार नेमकं काय म्हणाले?

या कार्यक्रमात शरद पवारांनी कार्यकर्त्यांना बुस्टर डोस दिला . "तुम्हाला एवढंच सांगतो. तुम्ही एकत्र राहा, तुम्ही कसे निवडून येत नाही हे मी बघतो. तुमच्या सगळ्यांच्या मदतीने इथली निवडणूक आपण जिंकू", असं शरद पवार यावेळी म्हणाले.

"महिन्या-पंधरा दिवसांत सगळे एकत्र बसून चर्चा करून मला येऊन सांगा. बारामतीत सांगा, नाहीतर पुणे-मुंबईत येऊन सांगा. आता आम्ही एक झालो आहोत. आमच्यापैकी कुणालाही तुम्ही संधी द्या, आम्ही त्याच्यासाठी काम करतो. एवढं तुम्ही मला सांगा. या तालुक्याचा चेहरा बदलेल याची खात्री मी तुम्हाला देतो", असा निर्धार यावेळी शरद पवार यांनी व्यक्त केला.

लोकसभेच्या पराभवावर चिंतन

सातारा लोकसभा निवडणुकीत भाजपाकडून उदयनराजे भोसले यांना तिकीट देण्यात आलं होतं. त्यात त्यांचा विजय झाला. त्यामुळे साताऱ्यात शरद पवार गटाला विधानसभा निवडणुकीत अधिक जोर लावावा लागणार असल्याचं स्पष्ट झालं.

या पार्श्वभूमीवर खुद्द शरद पवारांनी भेटी-गाठी सुरू केल्या आहेत. पराभवाचं चिंतन केल्यानंतर शरद पवारांनी कार्यकर्त्यांना एक होण्याचं आवाहन केलं. कोणत्याही परिस्थितीत विधानसभेच्या सर्व जागा जिंकायच्या असं नियोजन राष्ट्रवादीने केल्याचं या बैठकीतून दिसलं.

More From
Prev
Next
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+