नीलम गोऱ्हे यांचे वक्तव्य मूर्खपणाचे; शरद पवारांचा टोला; म्हणाले- संजय राऊत बोलतात ते 100% सत्य

Sharad Pawar on Neelam Gorhe : उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत दोन मर्सिडीज दिल्या की पदं भेटतात, असे वादग्रस्त विधान शिंदे गटाच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी केले होते. त्यावर आता राष्ट्रवादी SP गटाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी भाष्य करून नीलम गोऱ्हे यांचा समाचार घेतला. नीलम गोऱ्हे यांचे विधान हे मुर्खपणाचे लक्षण आहे, असे म्हणून त्यांनी खडेबोल सुनावले. तर संजय राऊत यांच्या विधानाचे त्यांनी समर्थन केले.

शरद पवार काय म्हणाले?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कार्यक्रम वेगळ्या ठिकाणी होता. तर संमेलनातील इतर कार्यक्रम हे तालकोट मैदानावर झाले. साहित्य संमेलन यशस्वी झाले असे म्हटले तर अतिशयोक्ती ठरणार नाही, असे राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे. संजय राऊत यांनी केलेल्या विधानाचे शरद पवार यांनी समर्थन केले आहे. संजय राऊत जे बोलले ते शंभर टक्के बरोबर आहे, असेही ते म्हणाले.

Sharad Pawar on Neelam Gorhe

नीलम गोऱ्हे यांचे वक्तव्य मूर्खपणाचे

नीलम गोऱ्हे यांच्यावर बोलताना शरद पवार म्हणाले, नीलम गोऱ्हे यांना चार टर्म कशी मिळाली हे सर्वांना माहीत आहे. तसेच नीलम गोऱ्हे यांना असे भाष्य करण्याची गरज नव्हती. नीलम गोऱ्हे यांचे वक्तव्य मूर्खपणाचे होते. तसेच त्यांनी ते भाष्य केले नसते तर बरे झाले असते. संजय राऊत जे म्हणतात ते योग्य आहे.

साहित्य परिषदेच्या नेत्यांनी माफी मागितली

संजय राऊत यांनी नीलम गोऱ्हे यांच्या वादग्रस्त विधानानंतर नाराजी व्यक्त करत अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळाला पत्र पाठवले होते. संजय राऊत यांनी आयोजकांवर जाहीर नापसंती व्यक्त केली होती. त्यानंतर साहित्य परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी माफी मागितली असल्याची माहिती शरद पवार यांनी दिली आहे.

हे ही वाचा : 2 मसिर्डीज अन् ठाकरे गटात मिळत असे पद, नीलम गोऱ्हेंचा मोठा गौप्यस्फोट, अंधारे म्हणाल्या- त्यांनी...

धनंजय मुंडेंवरुन साधला निशाणा, म्हणाले- नैतिकता अन्...

शरद पवार यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावर देखील भाष्य केले. पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना शरद पवार म्हणाले, नैतिकता आणि या लोकांचा काही संबंध असेल असे मला वाटत नाही. मी मस्साजोग या गावात जाऊन आलो आहे. त्या गावातील लोकांच्या भावना मी समजू शकतो. कोणालाही स्वाभिमान असेल अशी व्यक्ती त्या पदावर अजिबात राहणार नाही. पण संबंध राज्यातून लोकांचा हल्ला होत आहे तरी सुद्धा सत्तेवर आपण बसून राहायचे ही जी भूमिका घेऊन हे लोक वागत आहेत.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+