Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Shambhuraj Desai Biography : शंभुराज देसाईंनी घेतली मंत्रिपदाची शपथ, वाचा त्यांचा राजकीय प्रवास

Shambhuraj Desai Biography in Marathi : नव्याने स्थापन झालेल्या महायुती सरकारमध्ये, माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे लाडके पाटणचे आमदार आणि माजी मंत्री शंभूराज देसाई यांना संधी देण्यात आली आहे. देसाई यांच्या रूपाने शिंदे यांचा आणखी एक शिलेदार मंत्रिमंडळात समाविष्ट करण्यात आला आहे.

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत शंभूराजे देसाई यांनी अपक्ष उमेदवार सत्यजित पाटणकर यांचापट ३४ हजार मतांनी पराभव केला. उद्धव ठाकरे गटाने दिलेले हर्षद कदम हे उमेदवार चक्क तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले. देसाई यांच्या राजकीय कारकिर्दीचा विचार करता अत्यंत विपरीत परिस्थितीत साताऱ्या सारख्या काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेला प्रवेश मिळवून दिला तो शंभूराज देसाई यांनी.

Shambhuraj Desai Biography

शंभूराज देसाई हे सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्याच्या देसाई या नामांकित राजकीय कुटुंबातील व्यक्तिमत्व. त्यांचे आजोबा जिल्हा लोकल बोर्डाचे सदस्य आणि राज्यात मंत्रीही होते. पण देसाई आणि पाटणकर या वादात पाटण तालुक्यात पारडे कमी अधिक फरकाने दोघांच्याही बाजूने झुकायचे. 1995 साली राज्यात शिवसेना-भाजप युतीचे सरकार आले आणि 1997 च्या आसपास शिवसेनेने शंभूराजे देसाई यांना सहकार परिषदेचे अध्यक्ष करून संधी दिली. 1999 साली शंभूराजे देसाई शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढवून पराभूत झाले. 2004 साली मात्र त्यांचा विजय झाला आणि शिवसेनेचा सातारा जिल्ह्यात खऱ्या अर्थाने प्रवेश झाला. 2004 साली निवडून आलेले शंभूराज 2009 साली पुन्हा पराभूत झाले मात्र 2014 आणि 19 अशा सलग दोन निवडणुकात त्यांनी बाजी मारली आणि मंत्री शंभूराज देसाई ही ओळख पाटण तालुक्यात निर्माण झाली.

पाटण तालुक्याचे नेतृत्व

पाटण तालुका हा सातारा जिल्ह्यातील डोंगरी तालुका आहे. पाटण तालुक्यातील बहुसंख्य तरुण रोजगाराच्या शोधात मुंबई स्थिरावले. या मुंबईकर पाटणकरांची शंभूराज देसाई यांनी चांगलीच मोट बांधली आणि संघटन उभा केले. 2022 साली महाराष्ट्रात जो उलटफेर झाला त्यात शंभूराजे देसाई यांनी एकनाथ शिंदे यांना सुरुवातीपासून साथ दिली. एकनाथ शिंदे यांचा शंभूराज देसाई यांच्यावर प्रचंड विश्वास आहे. म्हणूनच शिंदे यांच्या पहिल्याच मंत्रिमंडळात शंभूराज देसाई यांना उत्पादन शुल्क खात्याचे मंत्री म्हणून संधी देण्यात आली. ठाणे हा एकनाथ शिंदे यांचा जिल्हा. पण ठाण्याचे पालकमंत्री पद देखील एकनाथ शिंदे यांनी मोठ्या विश्वासाने शंभूराज देसाई यांच्याकडे सोपवले.

एकनाथ शिंदे यांचा समर्थ बचाव

सभागृहात आणि सभागृहा बाहेर देखील उद्धव ठाकरे गटाच्या तोफखान्याला तोंड देण्यात शंभूराज देसाई आघाडीवर होते. खास सातारी भाषेत त्यांनी शिंदे यांच्यावर झालेल्या हल्ल्यांचा चांगलाच समाचार घेतला.

विकासासाठी सतत प्रयत्नशील

देसाई यांच्या पुढाकाराने उत्पादन शुल्क खात्याच्या अधिकाऱ्यांसाठी स्वतंत्र प्रशिक्षण केंद्र उभारण्याकरिता राज्य सरकारने तब्बल 94 कोटी रुपये मंजूर केले आहेत. याचा कोनशीला समारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते नुकताच संपन्न झाला. पाटण तालुक्यात कोयना वॉटर टुरिझम प्रोजेक्ट अंतर्गत सरकारने 41 किलोमीटरचा कोयना ते पापर्डे बोट टुरिझम मार्ग मंजूर केला आहे. या माध्यमातून पाटण तालुक्यात पर्यटन क्षेत्राचा विकास होणार असून 75 हजार ते एक लाख रोजगाराच्या प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष संधी निर्माण होणार आहेत.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+