शिवसेना ठाकरे गटाची दुसरी यादी जाहीर, संपूर्ण यादी...कोणाला कुठून मिळाली उमेदवारी वाचा सविस्तर
मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची अधिकृत उमेदवारांची दुसरी यादी जाहीर झाली. यात 15 जणांचा समावेश आहे. महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा फॉर्म्यूला आता अंतिम टप्प्यात आला.

वाचा संपूर्ण यादी...कोणाला कुठून मिळाली उमेदवारी
धुळे शहर- अनिल गोटे
चोपडा (अज)- राजू तडवी
जळगाव शहर- जयश्री सुनिल महाजन
बुलढाणा- जयश्री शेळके
दिग्रस- पवन श्यामलाल जयस्वाल
हिंगोली- रुपाली राजेश पाटील
परतूर- आसारामा बोराडे
देवळाली(अजा)- योगेश घोलप
कल्याण पश्चिम- सचिन बासरे
कल्याण पूर्व- धनंजय बोडारे
वडाळा- श्रध्दा श्रीधर जाधव
शिवडी- अजय चौधरी
भायखळा- मनोज जामसुतकर
श्रीगोंदा- अनुराधा राजेंद्र नागावडे
कणकवली- संदेश भास्कर पारकर
महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा फॉर्म्यूला ठरला
महाविकास आघाडीतील जागा वाटपाचा अंतिम फॉर्म्यूला आता समोर आला आहे. महाविकास आघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादी, कॉंग्रेस या तिन्ही प्रमुख पक्ष 85 ऐवजी 90-90-90 जागा लढणार आहेत. अशी माहिती कॉंग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी दिली, याबाबतचं वृत सामना या वृतपत्राने दिलं आहे. सामना वृतपत्रात म्हटलं आहे की, जागावाटपात इतर घटक पक्षांनाही मानाचे स्थान देण्यात आलं असून 18 जागा त्यांना सोडल्या असल्याचं सांगितलं आहे.












Click it and Unblock the Notifications