Savarkar jayanti 2025 : स्वातंत्र्यवीर सावरकरांचे हे 10 प्रेरणादायी विचार, जीवनाला देतील आकार
Savarkar Jayanti 2025 : तुज साठी मरण ते जनन तुज विन जनन ते मरण अशा आशयाचे जयोस्तूते श्रीमहन्मंगले हे गीत रचणारे आणि मातृभुमीबद्दल उद्दात्त विचार मांडणारे आणि देशाच्या स्वातंत्र्यासाठी जीवाची बाजी लावणारे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची 28 मे 2025 मे रोजी जयंती आहे.

शेकडो क्रांतीकारांचे प्रेरणास्थान असलेले स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात सक्रीय योगदान दिलं आहे. त्यांची अंदमानातील काळ्या पाण्याची शिक्षा असो की, त्यांचे समुद्रात मारलेली उडी हे सर्व खूप प्रेरणादायी आहे. वीर सावरकरांची आज जयंती त्यानिमित्त त्यांच्या जीवनातील 10 प्रेरणादायी विचार व संदेश कोणते, ते जाणून घेऊया...!
Veer Savarkar स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे प्रेरणादायी विचार!
1) "आपण एकटे असलो तरी हरकत नाही आपल्यामागे कुणी येवो ना येवो जे आपल्याला करावंसं वाटतं ते करण्यातच आपल्या जीवनाची सार्थकता आहे."
2) "अस्पृश्यता हा एक शाप आहे ज्याने आपल्या राष्ट्राच्या इतिहासावर सावली टाकली आहे आणि तो अंधारात टाकला आहे. अगदी बरोबर, अस्पृश्यतेच्या प्रथेचे समर्थन काहीही करू शकत नाही.
3) "बुद्धीची प्रतिष्ठापना केल्यावर जो धर्म समाजात अस्तित्वात राहील त्यालाच ते विज्ञानधर्म मानतात.
मी समुद्रात टाकलेली उडी लोक विसरले तरी चालेल, पण माझा सामाजिक विचार त्यांनी विसरू नये विज्ञानधर्माशिवाय माणसाचा विकासच होऊ शकत नाही."
4) "आपण एकटे असलो तरी हरकत नाही. आपल्यामागे कुणी येवो ना येवो, जे आपल्याला करावंसं वाटतं ते करण्यातच आपल्या जीवनाची सार्थकता आहे.
आपले भाग्य मनुष्य स्वतः घडवतो, ईश्वर नाही.
मनुष्याची सर्व शक्तीचे मूळ हे त्याच्या अहं मध्ये दडलेले आहे."
5) "देहाकडून देवाकडे जाताना देश लागतो आणि या देशाचे आपण देणे लागतो."
6) "उदात्त ध्येयासाठी केलेले बलिदान कधीही वाया जात नाही. हे मातृभूमी तुझंसाठी मरण ते जनन, तुझविण जनन ते मरण"
7) "शेवटी, या जगात, मानवाच्या बाबतीत, एकच वंश आहे जो सामान्य रक्ताने, मानवी रक्ताने जिवंत ठेवला आहे. इतर सर्व चर्चा तात्पुरत्या, तात्पुरत्या आणि फक्त तुलनेने खऱ्या आहेत."
8) "जो कोणी सिंधूपासून सिंधूपर्यंत (सिंधू ते समुद्र) भारत नावाच्या या विशाल भूभागाला आपली पितृभूमी (किंवा पूर्वजांची भूमी) आणि पवित्र भूमी मानतो तोच हिंदू म्हणून ओळखला जाईल आणि त्याचे स्मरण केले जाईल.
9) "एक देश, एक देव, एक जात, एक मन, भाऊ, आपण सर्वजण कोणताही भेदभाव न करता, कोणताही संशय न घेता."
10) "सर्व राजकारणाचे हिंदूकरण करा आणि हिंदू धर्माचे लष्करीकरण करा"












Click it and Unblock the Notifications