संतोष देशमुख हत्या- वेपन रिपोर्ट : 4 हत्यार, 150 घाव, 56 जखमा अन् मृत्यू; पाईपाचे झाले 14 तुकडे

Santosh Deshmukh murder case - Weapon Report News : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख अपहरण आणि हत्या प्रकरणी हत्यारांचा अहवाल आता समोर आला आहे. यामध्ये गॅसचा पाईप, गाडीच्या वायरचा चापक, लाकडी बांबू आणि लोखंडी पाईप या चार हत्याराने देशमुखांना मारहाण करण्यात आल्याचे फोटोमधूनही समोर आले.

वाल्मीक कराड यांच्या मार्गदर्शनाखाली सुदर्शन घुलेच्या गॅंगने हे चारही हत्यार तयार केल्याचा उल्लेख अहवालात करण्यात आला आहे. तर या अहवालामध्ये असे नमूद करण्यात आले आहे की, जर या हत्याराने एखाद्याला मारहाण झाली तर या घटनेमध्ये त्याचा मृत्यू होऊ शकतो असेही या अहवालामध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आलेला आहे.

Santosh Deshmukh murder case

फुफ्फुसाला इजा, चेहऱ्यावर जखमा

देशमुख यांच्या शरीरावर 150 वार केल्याचे व्रण आणि 56 जखमा असल्याचे शवविच्छेदनाच्या अंतिम अहवालातून समोर आले. त्यामुळे देशमुख यांना किती क्रूरतेने मारण्यात आले हे स्पष्ट झाले. अहवालानुसार मृत देशमुख यांना रॉडसारख्या शस्त्राने अमानुषपणे मारहाण करण्यात आली होती. पाठीसह छाती, हात, पाय आणि चेहऱ्यावरदेखील वार करण्यात आले. तसेच त्यांच्या फुफ्फुसाला इजा झालेली आहे.

Santosh Deshmukh murder cas

मारहाणीमुळे गेले शॉकमध्ये

संतोष देशमुख यांना प्रचंड मारहाण झाली.‎यामुळे ते शॉकमध्ये गेले. त्यामुळे शवविच्छेदन अहवालाचा अंतिम निष्कर्ष हा‎'हॅमरेज अँड शॉक ड्यू टू मल्टिपल इंज्युरीज'असा नमूद करण्यात आला आहे.‎

ज्या पाईपने मारले त्याचे 15 तुकडे झाले

संतोष देशमुख यांना मारहाण करण्यासाठी ज्या पाईपचा वापर केला होता, त्या पाईपचे अक्षरशः 15 तुकडे झाले आहेत. इतकी बेदम मारहाण संतोष देशमुख यांना करण्यात आली होती. ही मारहाण इतकी भीषण होती की त्या पाईपचे तब्बल 15 तुकडे पडले. घटनास्थळी या पाईपचे तुकडे सीआयडीच्या तपासात हाती लागले आहेत. पाईपच्या पडलेल्या तुकड्यांचे फोटो देखील सीआयडीने चार्जशीटमध्ये पुरावा म्हणून जोडण्यात आले आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+