सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट; फरार आरोपी कृष्णा आंधळेची संपत्ती जप्त अन्....
Santosh Deshmukh murder case update : बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात मोठी माहिती समोर आली आहे. या घटनेतील फरार आरोपी कृष्णा आंधळे याची संपत्ती जप्त करण्याचे आदेश न्यायालयाने सीबीआयला दिले आहेत. या संदर्भात तपास यंत्रणांच्या वतीने संपत्ती जप्त करण्याची मागणी न्यायालयाकडे करण्यात आली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, कृष्णा आंधळे याच्या नावावर पाच वाहने आणि धारूर तसेच केज मध्ये बँक खाती आहेत. ती खाते गोठवण्यात आली असून सर्व संपत्ती जप्त करण्यात आली आहे. त्यामुळे आरोपी पुढे येईल का ये पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

दोन महिन्यांपासून आरोपी कृष्णा आंधळे फरारच
संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर आता दोन महिने झाले असले तरी या प्रकरणातील फरार असलेला कृष्णा आंधळे अद्यापही तपास यंत्रणांना सापडलेला नाही. त्यामुळे तो फरार आहे. तर या प्रकरणात सात आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात येत आहे. तर वाल्मीक हा हत्येचा मुख्य सूत्रधार असल्याचे आरोप होत आहेत. इतर सर्व आरोपींना अटक करण्यात तपास यंत्रणांना यश आले असले तरी दुसरीकडे कृष्णा आंधळे अद्यापही फरार आहे.
हे ही वाचा : धस-मुंडे भेटीवर कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळांचा टोला; म्हणाले- आता मांडवली..मांडवली..दिसून येतेय
संतोष देशमुख खून प्रकरण नेमकं कसे घडले?
- मस्साजोग येथे आवादा कंपनीचे पवनचक्की उभारण्याचे काम सुरू आहे. या कंपनीकडे वाल्मीक कराडने 2 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप आहे.
- या प्रकरणी तो 6 डिसेंबर रोजी पवनचक्की उभारल्या जाणाऱ्या घटनास्थळी गेला होता. त्यावेळी त्याचा तेथील वॉचमनशी वाद झाला.
- त्यानंतर वॉचमनने गावचे सरपंच असणाऱ्या संतोष देशमुख यांना त्याची माहिती दिली. त्यानंतर संतोष देशमुख काही गावकऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले. त्यातून त्यांचा सुदर्शन घुले सोबत वाद झाला. या वादाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
हे ही वाचा : संतोष देशमुखांच्या हत्येनंतर कराड अन् पोलिसांची मुंडेंच्या बंगल्यावर बैठक;'या'खासदाराचा गंभीर आरोप
- या वादामुळे सुदर्शन घुले व त्याच्या सहकाऱ्यांमध्ये अपमानाची भावना निर्माण झाली होती. त्यातूनच त्यांनी संतोष देशमुख यांचे अपहरण करून त्यांचा निर्घृण खून केल्याचे सांगितले जाते. पण खंडणी प्रकरणाशी वाल्मीक कराड याचा संबंध असल्यामुळे या प्रकरणाचा संतोष देशमुख यांच्या खुनाचीही संबंध जोडला जात आहे.
- या प्रकरणात वाल्मीक कराड याच्यासह 8 आरोपींना अटक करण्यात आली असून सर्वांवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. मात्र, या हत्या प्रकरणातील कृष्णा आंधळे हा आरोपी अजुनही पोलिसांना सापडलेला नाही.












Click it and Unblock the Notifications