Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

वाल्मीक कराड जेलमध्ये असला तरी त्याची कामे पोलिस अधिकारीच करतात; कोणी केला गंभीर आरोप!

Beed Santosh Deshmukh Murder Case : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येला एक वर्ष पूर्ण झाले असले तरी या प्रकरणातील गुंता दिवसेंदिवस वाढत चालला आहे.

सामाजिक कार्यकर्ते बाळा बांगर यांनी या हत्येबद्दल केलेला दावा अत्यंत धक्कादायक असून, त्यांनी थेट पोलीस यंत्रणेवर गंभीर आरोप केले आहेत. "ही केवळ हत्या नसून 'संस्थात्मक खून' आहे," असे बांगर यांनी म्हटले आहे.

Beed Santosh Deshmukh Murder Case

पोलीस अधिकारीच आरोपीचे काम पाहतोय!

संतोष देशमुख यांच्या हत्येच्या वर्षपूर्तीनिमित्त बाळा बांगर यांनी पीडित कुटुंबाची भेट घेतली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी पोलीस दलात मोठी खळबळ उडवणारा दावा केला. बांगर यांच्या मते, यातील आरोपी जेरबंद असले तरी, एक पोलीस अधिकारी मुख्य आरोपी वाल्मीक कराडची सगळी 'यंत्रणा' सांभाळत आहे. त्यांनी बीड स्थानिक गुन्हे शाखेचे (LCB) तत्कालीन पोलीस निरीक्षक हे आरोपी वाल्मीक कराडचे काम पाहत असल्याचा थेट आरोप केला आहे. "आरोपी तुरुंगात असले तरी त्यांना बाहेरून रसद पुरवली जात आहे," असेही त्यांनी नमूद केले.

पोलिस अधिक्षकांनी दिली जातेय चुकीची माहिती!

बाळा बांगर यांनी पोलीस यंत्रणेतील हे लोक पोलीस अधीक्षकांनाही चुकीची माहिती देत असल्याचा आरोप केला आहे. "ज्यांनी रक्षण करायचे, तेच जर भक्षकाला मदत करत असतील, तर याला संस्थात्मक हत्याच म्हणावे लागेल," असे बांगर म्हणाले. त्यांनी लवकरच त्या पोलीस अधिकाऱ्यांची नावे उघड करण्याची धमकी दिली आहे.

तपासाच्या गतीवर नाराजी आणि १२ डिसेंबरला 'चार्ज फ्रेम'

बाळा बांगर यांनी तपासाच्या संथ गतीबद्दल आणि यंत्रणेवर नाराजी व्यक्त केली आहे. मुख्य आरोपी कृष्णा आंधळे अजूनही फरार आहे, त्यामुळे यंत्रणेवर संशय बळावतो," असे ते म्हणाले. या प्रकरणात येत्या १२ डिसेंबर रोजी न्यायालयात दोषारोप निश्चिती होणार आहे. पुढच्या वर्षी ९ डिसेंबरपर्यंत आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी, अशी आमची अपेक्षा आहे," अशी भावना बांगर यांनी व्यक्त केली.

हत्येमागचा घटनाक्रम : खंडणी आणि व्हायरल व्हिडीओ

29 नोव्हेंबर : आरोपी वाल्मीक कराडने 'अवादा' पवनचक्की कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे दोन कोटींच्या खंडणीची मागणी केली. पैसे न दिल्यास काम बंद पाडण्याची आणि जीवे मारण्याची धमकी दिली होती.

6 डिसेंबर : दुपारी 12.30 वाजता कराडचे साथीदार अशोक घुले, सुदर्शन घुले, प्रतिक घुले यांनी पवनचक्की प्रकल्पात घुसून अधिकारी शिवाजी थोपटे आणि वॉचमनला बेदम मारहाण केली.

संतोष देशमुखांची एन्ट्री : वॉचमन हा मस्साजोगचा असल्याने त्याने सरपंच संतोष देशमुखांना फोन केला. देशमुख यांनी घटनास्थळी धाव घेत कराड गँगला तिथून हुसकावून लावले.

हत्येचे कारण : देशमुखांनी गुंडांना पळवून लावल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. यामुळे आपली दहशत कमी होईल या भीतीपोटी आणि अपमानाचा बदला घेण्यासाठी आरोपींनी संतोष देशमुखांची हत्या केली.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+