ठाण्याच्या दाढीला हलक्यात घेतल्यावर, काय अवस्था झाली..? संजय शिरसाटांचा राऊतांना टोला
महाराष्ट्रात सत्तास्थापनेचा पेच कायम आहे. शिवसेनेच्या शिंदे गटाच्या वाट्याला किती मंत्रीपदे येतात, हेही अजून ठरलेले नाही. त्यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गृहमंत्रीपदासाठी अडून बसले असल्याच्या बातम्याही येत आहेत. महाविकास आघाडीने व विशेषतः ठाकरे गटाने भाजपने एकनाथ शिंदे यांचा वापर केल्याचा आरोप केला. शिवाय शिंदे यांना मानसिक आजार झालाय, असा आरोपही संजय राऊत यांनी केला होता. याच सर्व आरोपांचा शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी चांगलाच समाचार घेतला आहे.

संजय राऊत यांच्यावर निशाणा
संजय शिरसाट यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना, खा. संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले, संजय राऊत याच्यामुळेच शिवसेना पक्ष संपला. तरीही त्याची बडबड सुरुच आहे. शरद पवारांच्या पक्षालाही संजय राऊत यांच्या बडबडीमुळेच हे दिवस आलेत. शेतकऱ्याच्या मुलाचा अपमान करणं, एवढं एकच काम संजय राऊत करत आहेत.
उतारा करण्यासाठी शिंदे गावी
एकनाथ शिंदे त्यांच्या दरे या गावी का गेलेत, याचं उत्तरही संजय शिरसाट यांनी दिले. ते म्हणाले, संजय राऊतने आमच्या पक्षावर निवडणुकीआधी लिंबू फिरवला होता. त्याचा उतारा करण्यासाठीच एकनाथ शिंदे हे त्यांच्या दरे या मुळगावी गेले आहेत, असंही शिरसाट यांनी स्पष्ट केलं. संजय राऊतांना दुसरं कामच नाही, असंही त्यांनी म्हटलं.
दाढीला हलक्यात घेऊ नका
शिरसाट पुढे म्हणाले की, "मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जेव्-हा जेव्हा दाढीवरून हात फिरवतात, तेव्हा- तेव्हा मोठं काहीतरी घडतं. त्यामुळे ठाण्याच्या दाढीला हलक्यात घेता कामा नये. हेच हलक्यात घेण्याचं काम ठाकरेंनी केलं आणि आता त्यांची काय अवस्था झाली, हे महाराष्ट्रानं पाहिलं. त्यामुळे जेव्हा शिंदे साहेब गावावरुन येतील, त्यानंतर सगळ्या घडामोडी घडतील. त्यांना हलक्यात घेतल्यानेच राऊतांची व त्यांच्या पक्षाची काय असवस्था झाली, हे सगळ्यांनी पाहिलंय, असं म्हणत शिरसाट यांनी राऊतांना धो-धो धूतलं.
दोन दिवसांत बैठकांचा जोर
काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे साताऱ्यातील दरे गावात मुक्कामी आहेत. त्यांची प्रकृती बिघडल्याने ते विश्रांतीसाठी गावी गेले आहेत. शनिवार आणि रविवार असे दोन दिवस एकनाथ शिंदे हे दरेगावात मुक्कामी आहेत. आज रात्री ते मुंबईत परतणार आहेत असं बोललं जात आहे. यानंतरच पुढच्या दोन-तीन दिवस महायुतीच्या बैठका होतील, असेही शिरसाट यांनी सांगितले.












Click it and Unblock the Notifications