Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

संजय राऊतांना शिक्षा! काय केले होते त्यांनी आरोप अन् कोणता खटला? 4 मुद्द्यात वाचा आतापर्यंतची अपडेट

Sanjay Rauts Punishment Defamation Case : संजय राऊत यांना अब्रु नुकसानीच्या खटल्यात शिवडी न्यायालयाने 15 दिवसांची शिक्षा सुनावत 25 हजार रुपये दंडही ठोठावला आहे. यानंतर संजय राऊत पुन्हा चर्चेत आले आहेत. त्यांनी आपल्याला सुनावण्यात आलेल्या शिक्षेवर प्रतिक्रीया दिली असून संजय राऊत म्हणाले-15 वर्षे शिक्षा ठोठावली तरी, सत्य बोलण्याचे थांबणार नाही असं म्हटलं आहे.

शौचालय घोटाळ्याचं प्रकरण नेमकं काय आहे, त्यांच्याविरोधात कुणी याचिका दाखल केली होती अन् संजय राऊत यांनी काय आरोप केले होते हे आपण या रिपोर्टमधून जाणून घेणार आहोत.

Sanjay Rauts Punishment Defamation Case

1. आरोप करताना काय म्हणाले होते संजय राऊत?

"मी या महाशयांचा एक शौचालय घोटाळा काढणार आहे.मिरा भाईंदर महानगर पालिका आणि इतरत्र काही कोटींचा शौचालय घोटाळा झाला आहे. ही सर्व कागदपत्रं सुपुर्द झाली आहेत. युवा प्रतिष्ठान ही सामाजिक संस्था जी चालवत होते ते हे लोक त्यांनी शेकडो कोटींचा शौचालय घोटाळा केला होता." यात त्यांनी मेधा सोमय्या आणि किरीट सोमय्या यांची नावं घेतली होती.

2. मेधा सोमय्यांची याचिका अन् राऊतांना शिक्षा

संजय राऊत यांच्या या आरोपानंतर मेधा सोमय्या यांनी शिवडी कोर्टात अब्रुनुकसानीची याचिका दाखल केली होती त्यावर कोर्टाने संजय राऊत यांना 25 हजारांचा दंड आणि 15 दिवस तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. मेधा सोमय्या यांनी आज संजय राऊत यांना सुनावण्यात आलेल्या शिक्षेसंदर्भात आपली प्रतिक्रीया दिली. त्या माध्यमांशी बोलताना म्हणाल्या, न्यायालयाने दिलेला निकालाने आपण समाधानी आहोत असं त्या म्हणाल्या.

3. Sanjay Rauts Punishment प्रकरणातील टप्पे

  • मिरा भाईंदरमध्ये शौचालय बांधकामाचे हे प्रकरण आहे.
  • शोचालयाच्या बांधकामात शंभर कोटींच्या घोटाळ्याचा संजय राऊत यांचा मेधा सोमय्या आणि किरीट सोमय्या यांच्यावर आरोप केला होता.
  • संजय राऊत यांच्याविरोधात मेधा सोमय्या यांनी कोर्टात याचिका दाखल केली होती.
  • संजय राऊत यांच्यावर आयपीसी 499 अंतर्गत खटला चालवला गेला.
  • शिवडीच्या शहर न्यायदंडाधिकाऱ्यांनी संजय राऊत यांना आज शिक्षा सुनावली.
  • यात संजय राऊत यांना दोषी ठरवत 15 दिवसांचा कारावास आणि 25 हजारांचा दंड न्यायालयाने ठोठावला.

4. संजय राऊतांच्या शिक्षेला 30 दिवस स्थगिती

संजय राऊत यांना आज न्यायालयाने जी शिक्षा सुनावली. त्यानंतर संजय राऊत यांना लगेचच 15 हजारांच्या जातमुचलक्यावर कोर्टाने जामिनही दिला आहे. तसेच सुनावलेल्या शिक्षेला 30 दिवस स्थगितीही दिली आहे. राऊतांकडून त्यांच्या वकिलांनी दोन याचिका आज कोर्टात टाकल्या होत्या. त्यावर आज कोर्टाने निर्णय दिला आहे.

या शिक्षेतून संजय राऊत यांनी बोध घ्यावा - दरेकर

भाजप नेते प्रवीण दरेकर म्हणाले, "संजय राऊत यांच्याविरोधात जर दर आठवड्यात कुणी अब्रुनुकसानीचा दावा केला तर राऊत यांना दंड होईल आणि शिक्षा ठोठावली जाईल.निराधार, बिनबुडाची वक्तव्य संजय राऊत हे करत असतात. महिला भगिनींच्या बाबतीत त्यांच्या तोंडाला कुठलाही लगाम नसतो. कोर्टाने जर अशी शिक्षा त्यांना केली असेल तर त्यांनी यातून बोध घेत त्यांनी बडबड आणि वाचाळ वक्तव्य थांबवावीत.शिक्षा सुनावून कोर्टानं एकप्रकारे संजय राऊत यांच्या बेताल वक्तव्यावर लगाम घातला आहे."

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+