सत्तेसाठी आम्ही शहांचे पाय चाटणार नाही... संजय राऊत- चंद्रकांत पाटलांची जुगलबंदी; थेट केला 'हा' आरोप
भारतीय जनता पक्षाचे नेते चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या टीकेला शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी नाशिक येथे पत्रकार परिषदेत सडेतोड उत्तर दिले. महापालिका निवडणुकांपूर्वी पक्षगळती होत असल्याच्या पाटील यांच्या वक्तव्यावर राऊत यांनी तीव्र शब्दात पलटवार केला. ठाकरे गटाला सत्तेत यायचंय पण त्यांना घेतलं जात नाही, असं मंत्री चंद्रकांत पाटील पुण्यात म्हणाले होते. त्यावर आता खा. संजय राऊत यांनी जोरदार उत्तर दिलंय.

काय म्हणाले होते पाटील?
पुण्यातील कार्यक्रमात चंद्रकांत पाटील यांनी खा. संजय राऊत व उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला होता. ते म्हणाले होते, २०२४ ला महायुतीला २३७ जागा मिळाल्या. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यावर उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांची दोन-तीन वेळा भेट घेतली. आदित्य ठाकरेही फडणवीसांना भेटले. त्यानंतर ठाकरे गट हा भाजपसोबत येईल अशा चर्चा सुरु झाल्या. मात्र फडणवीसांनी हा दावा साफ फेटाळला. ठाकरे गटाला सत्तेत यायचंय, पण त्यांना घेतलं जात नाही, असा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला होता.
राऊतांचं सडेतोड उत्तर
चंद्रकांत पाटील यांनी फडणवीस व अमित शहांचा दाखला दिल्यावर संजय राऊत यांनीही जोरदार पलटवार केला. ते म्हणाले, "ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला. औरंगजेबाच्या कबरीला समाधीचा दर्जा दिला. त्यांच्यासोबत आम्हाला सत्ता नको. आपण किंवा उद्धव ठाकरे सत्तेसाठी कधीही लाचार झालो नाही आणि होणार नाही, असेही ते म्हणाले.
स्वतःची चिंता करावी
राऊत पुढे म्हणाले की, चंद्रकांत पाटील यांनी स्वतःच्या पक्षाची आणि सत्तेची चिंता करावी. फसवणूक आणि खोटेपणा करून तुम्ही सत्तेत आला आहात. ती सत्ता तुम्हाला मुबारक असो. तुमच्यासोबत असलेले भ्रष्ट आणि चोर लोकांना सांभाळत बसा," अशा कठोर शब्दांत त्यांनी भाजपवर टीका केली.












Click it and Unblock the Notifications