Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

एकनाथ शिंदे हे आधीही वेश बदलून कुणाला भेटायला जात होते? संजय राऊतांनी सगळंच सांगून टाकलं!

एकनाथ शिंदे, अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांनी मराठी चित्रपट सृष्टीचे नुकसान केलं ते उत्तम वेशांतर करतात. चेहरे बदलतात. एकनाथ शिंदे खोट्या कथा लिहून सिनेमा काढत आहेत. एकनाथ शिंदे हे आधीही वेश बदलून कुणाला भेटायला जात होते? यासंदर्भात शिवसेना ठाकरे गटाचे खासदार आणि नेते संजय राऊतांनी सगळंच सांगून टाकलं!

मनात कपट आधीपासूनच

संजय राऊत म्हणाले, वेशांतर, तोंडाला मुखवटे घालून देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे भेटत होते. महाराष्ट्राशी कपट किती आधीपासून सुरु होतं हे आता हळूहळू स्पष्ट होत आहे.

Devendra Fadnavis met Eknath Shinde in disguise before forming the grand coalition government

उत्तम चेहरे बदलतात

संजय राऊत म्हणाले, महाराष्ट्राच्या रंगमंचावर अनेक मोठे मोठे कलाकार होऊन गेले होत आहेत. त्या नाट्यसृष्टीनं अजित पवार, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंकडे दुर्लक्ष केलेले दिसते. ते उत्तम पद्धतीने ते वेशभूषा साकारतात, उत्तम पद्धतीनं चेहरे बदलतात फिरत्या रंगमंचावर राजकारणातल्या राजकारणावर काम करतात.

अजित पवार खोट्या मिशा लावून भेटायचे

संजय राऊत म्हणाले, अजित पवार खोट्या मिशा लावून दिल्लीत अमित शहांना भेटायला जातात. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे वेश बदलून मुंबईतील दिव्याच्या लाईटखाली बसून सरकार कसं पाडायचं यावर चर्चा करीत होते. ते दोघे बोलत असताना लोक त्यांना ओळखत नव्हते म्हणजे किती हुबेहूब मेकअप त्यांनी केला असेल. फार मोठी गोष्ट आहे की, हे राजकीय कलाकार नाट्यसृष्टीत जाणे म्हणजे मराठी पडद्याचे फार मोठे नुकसान केले.

..तर मी कथानक लिहून देतो

संजय राऊत म्हणाले, खोट्या कथा लिहून एकनाथ शिंदे चित्रपट काढत आहेत. त्यांनी जे नाटक रचलं होतं. त्यावर त्यांना सिनेमा लिहिता येत नसेल तर मी उत्तम लेखक आहे. मी लिहितो. मलाही प्रसंग त्यांच्यापेक्षा जास्त माहित आहे. एकनाथ शिंदे हे आतापासून वेश बदलून जात नव्हते.

हे गुपित केलं उघड

एकनाथ शिंदे पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना अहमद पटेल यांना भेटायला वेश बदलून जात होते. जेव्हा भाजपचे राज्य नव्हते. केंद्रात काँग्रेसचे राज्य नव्हते तेव्हाही ते वेशांतर करुन अहमद पटेल यांना कसे भेटत होते हे पृथ्वीराज चव्हाण उत्तमरित्या सांगतील. अजित पवार हे उत्तम नटवर्य आहेत असेही राऊत म्हणाले.

सीएम पदासाठी वेगळं नाव समोर येईल

संजय राऊत म्हणाले, एकनाथ शिंदे हे मोठे नेते आहेत, ते 288 जागाही लढवू शकतात. विधानसभेच्या निकालानंतर कुणाला कळेल की, राज्याचे मुख्यमंत्रीपद कुणाला मिळेल हे कळेल. देवेंद्र फडणवीस, अजित पवार, एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद मिळणारच नाही. वेगळेच नाव समोर येईल.

पोटात एक ओठात एक

संजय राऊत म्हणाले, शिंदेंच्या पोटात आणि ओठात काय आहे याकडे लक्ष देऊ नका. महाराष्ट्रावर आठ लाख कोटींचं कर्ज आहे त्यामुळे ते लाडक्या बहिणींचा उद्धार कसा करणार..त्यांनी स्पष्ट करायला हवं, कारण राज्याच्या अर्थ खात्यानं आक्षेप घेतला आहे.

पियूष गोयल याच्यावर काय आरोप आहेत ते आम्हाला बोलू नका. अमित शहांवर तडीपारीची नोटीस, ते तुरुंगात होते. खुनाचा खटला गुजरातच्या बाहेर चालवावा हे सर्वोच्च न्यायालयानंच सांगितलं होतं असंही ते म्हणाले.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+