कोर्टात 'वैर', पण चेहऱ्यावर 'हास्य', राऊत-भुसे एकाच वेळी कोर्टात; मालेगावमध्ये नेमकं काय घडलं?

Sanjay Raut vs Dada Bhuse : राजकारणात 'कोणीच कोणाचा कायमचा शत्रू नसतो' या उक्तीचा प्रत्यय आज मालेगाव न्यायालयात पाहायला मिळाला. शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते तथा राज्याचे मंत्री दादा भुसे यांच्यातील कायदेशीर लढाई सध्या ऐन रंगात आहे. मात्र, आज सुनावणीसाठी न्यायालयात पोहोचलेले हे दोन्ही नेते ज्या पद्धतीने एकत्र दिसले, त्याने राजकीय विश्लेषकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

Sanjay Raut vs Dada Bhuse

कोर्टात एन्ट्री अन् राजकीय चर्चांना उधाण

मंत्री दादा भुसे यांनी संजय राऊत यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे. या खटल्याच्या सुनावणीसाठी दोघेही मालेगाव येथील अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयात हजर झाले. आश्चर्य म्हणजे, दोन्ही नेते एकाच वेळी न्यायालयात पोहोचले.

इतकेच नाही तर, कोर्टाच्या आवारात आणि आतमध्येही दोघे एकमेकांशी हसत-हसत गप्पा मारताना आणि शेजारी बसलेले दिसले. बाहेर एकमेकांवर तुटून पडणारे हे दोन नेते कोर्टात इतक्या मैत्रीपूर्ण वातावरणात कसे, याचीच चर्चा आता सर्वत्र रंगली आहे.

नेमका वाद काय आहे?

या वादाची मुळे गिरणा सहकारी साखर कारखान्याशी संबंधित आहेत. संजय राऊत यांनी सोशल मीडियावर दादा भुसे यांच्यावर १७८ कोटी रुपयांच्या शेअर्स घोटाळ्याचा आरोप केला होता. हा आरोप पूर्णपणे खोटा आणि आपली प्रतिमा मलीन करणारा आहे, असा दावा करत दादा भुसे यांनी राऊतांविरोधात फौजदारी खटला दाखल केला.

राऊतांची कोर्टात भूमिका: 'माझा संबंध नाही'

मागील सुनावणीला गैरहजर राहिल्यामुळे संजय राऊत यांना न्यायालयाने 12 हजार रुपयांचा दंड ठोठावला होता. त्यामुळे आज राऊत स्वतः न्यायालयात हजर झाले. त्यांनी आपल्या वकिलामार्फत एक प्रतिज्ञापत्र सादर केले असून, "या प्रकरणाशी माझा थेट संबंध नाही," असे सांगत या खटल्यातून मुक्त करण्याची विनंती केली आहे.

राजकीय शिष्टाचार की पडद्यामागची हालचाल?

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या आरोप-प्रत्यारोपांची पातळी खाली घसरत असताना, दोन भिन्न विचारधारेच्या आणि एकमेकांविरुद्ध कायदेशीर लढाई लढणाऱ्या नेत्यांमधील हे 'सौहार्द' अनेकांसाठी कुतूहलाचा विषय ठरले आहे. ही केवळ एक राजकीय सभ्यता होती?, की या वादावर पडद्यामागे काही तडजोड होण्याची चिन्हे आहेत?, या प्रश्नांची उत्तरे येणारा काळच देईल.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+