Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

सांगोल्यात काय प्रचार काय उमेदवार? ओक्केमधी कोण हाय? शहाजीबापू की बाबासाहेब देशमुख, कोण जिंकेल? वाचा

Sangola Assembly Election 2024 Shahaji Bapu Patil vs Babasaheb Deshmukh : सोलापूर जिल्ह्यातील सांगोला विधानसभा मतदारसंघ सध्या राज्यातील सर्वाधिक चर्चेचा विषय ठरला आहे. 1952 पासून येथे झालेल्या 16 निवडणुकांत धनगर समाजाचे 13 तर मराठा समाजाचे 3 आमदार निवडून आले आहेत. यामुळे सांगोला मतदारसंघात जातीय समीकरणं नेहमीच निर्णायक ठरली आहेत.

यावेळी सांगोल्यात तिरंगी लढत पाहायला मिळत आहे. शिवसेनेच्या शिंदे गटाकडून शहाजी बापू पाटील रिंगणात आहेत, तर दिवंगत गणपतराव देशमुख यांचे नातू डॉ. बाबासाहेब देशमुख हे शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत. दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेस सोडून शिवसेना (ठाकरे गट) गाठलेले दीपक साळुंके पाटील देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. यामुळे सांगोल्यात ही तिरंगी लढत लक्षवेधी ठरणार आहे.

Sangola Assembly Election 2024 Shahaji Bapu Patil vs Babasaheb Deshmukh

जातीय समीकरणांचे महत्त्व

सांगोल्यातील 40% मराठा समाजाचे मतदान निर्णायक मानले जाते, तर उर्वरित 60% मतांमध्ये धनगर समाज सर्वाधिक आहे. लोणारी, दलित, मुस्लिम, आणि लिंगायत समाजाचे देखील महत्त्वाचे योगदान असते. पारंपारिकपणे मराठा समाजाचे मतदार गणपतराव देशमुख यांच्या पाठीशी राहिल्याने त्यांनी अनेकदा विजयी घोडदौड केली.

इतिहासातील संघर्ष आणि निवडणूक परिणाम

सांगोला मतदारसंघात सुरुवातीपासूनच धनगर आणि मराठा समाजातील लढत दिसून येते. काँग्रेसच्या 1952 आणि 1957 च्या निवडणुकांत धनगर समाजाचे केशवराव राऊत यांनी विजय मिळवला, तर 1962 मध्ये शेकापचे गणपतराव देशमुख यांनी विजयी होऊन सांगोल्यात आपली मजबूत पकड ठेवली. 1972 च्या निवडणुकीत साळुंके यांनी देशमुख यांना पराभूत केले. मात्र, त्यानंतर 1974 मध्ये देशमुख यांनी पोटनिवडणुकीत पुन्हा विजय मिळवून विधानसभेत पुनरागमन केले. यानंतर 1980 ते 1990 या सलग चार निवडणुकांत देशमुख यांनी विजय मिळवला.

1995 मध्ये काँग्रेसचे शहाजीबापू पाटील केवळ 192 मतांनी विजयी झाले, तर पुढील निवडणुकांमध्ये देशमुख यांनी पुन्हा एकदा वर्चस्व सिद्ध केले. 2019 मध्ये देशमुखांच्या अनुपस्थितीत शहाजीबापूंनी शेतकरी कामगार पक्षाचे डॉ. अनिकेत देशमुख यांचा 768 मतांनी पराभव केला.

Take a Poll

आगामी निवडणुकीतील आव्हाने आणि शक्यता

या वर्षीच्या तिरंगी लढतीत जातीय समीकरणे पुन्हा प्रभावी ठरणार आहेत. शहाजीबापू पाटील आणि दीपक साळुंके यांच्यातील लढतीत मराठा समाजाची मते कुणाच्या बाजूला झुकतील हे महत्त्वाचे ठरणार आहे. तसेच गणपतराव देशमुख यांची पारंपरिक 'व्होट बँक' डॉ. बाबासाहेब देशमुख यांना पाठिंबा देईल का, याची उत्सुकता आहे.

Sangola Assembly Election 2024 Shahaji Bapu Patil vs Babasaheb Deshmukh

हेही वाचा : रविंद्र धंगेकर इज बॅक! हेमंत रासनेंनीही दाखवलाय दम; कसब्यात तिरंगी लढत रंगणार, कोण विजयी होणार? वाचा

सांगोल्यातील निवडणूक एक जातीय समीकरणांची परीक्षा

1952 पासून सांगोल्यातील निवडणुका या जातीय समीकरणांवरच अवलंबून राहिल्या आहेत. यंदा शिवसेनेच्या दोन गटांतील उमेदवार आणि शेकापच्या उमेदवारात होत असलेली लढत सांगोल्यातील निवडणुकीला एक नवा रंग देत आहे. त्यामुळे यंदा कोण बाजी मारणार, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+