Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

संभाजी भिडेंना कुत्रा चावला!,विरोधकांसह सत्ताधाऱ्यांचा उपरोधिक टोला, थेट SIT अन् फास्टट्रकचा उल्लेख!

Sambhaji Bhide dog bite case : शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी उर्फ मनोहर भिडे गुरूजी यांच्यावर कुत्र्याने हल्ला केल्याची घटना समोर आली होती. या घटनेवरून राज्यातील राजकारणात चांगलीच चर्चा रंगली आहे.

विरोधकांसह सत्ताधारी आमदारांनी संभाजी भिडे यांच्यावर जोरदार निशाणा साधला. कोण काय म्हणाले, सर्वजण भिंडे गुरूंजीवर अशी टीका का करू लागले आहेत. याचे विश्लेषण या लेखातून आपण करणार आहोत. भिडे गुरूंजीना चावा घेणाऱ्या कुत्र्याची एसआयटी चौकशी लावा, तर हे प्रकरण थेट फास्टट्रकमध्ये चालवा, असा उल्लेख करत सत्ताधारी व विरोधातील राजकीय नेत्यांनी उपरोधिक टोला लगावला.

Sambhaji Bhide dog bite case

वडेट्टीवार, आव्हाडांनी घेतला समाचार

विजय वडेट्टीवार आणि जितेंद्र आव्हाड यांनी उपरोधक टीका केली आहे. कुणाला चावावे हे कुत्र्याला कळले नाही याचे वाईट वाटते. संभाजी भिडे यांना चावणाऱ्या कुत्र्याची एसआयटी चौकशी करा, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली. तर महत्त्वाच्या माणसाला चावल्याशिवाय कुत्रे काही उचलले जात नाहीत, असा टोला जितेंद्र आव्हाड यांनी लगावला.

Take a Poll

शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांच्यावर कुत्र्याने हल्ला केला. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्यांना दोन इंजेक्शन दिले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. डॉक्टरांनी संभाजी भिडेंना विश्रांतीचा सल्ला दिला आहे. आता या घटनेवरून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार आणि शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी उपरोधिक टीका केली आहे.

हे ही वाचा : संभाजी भिडेंवर कुत्र्‍याचा हल्ला! जाणून घ्या कोण आहेत ते..? ज्यांना पंतप्रधान मोदीही म्हणतात गुरुजी

नेमके काय म्हणाले विजय वडेट्टीवार?

कुत्र्याला कुठून दुर्बुद्धी सुचली...कुणाला चावावे हे कुत्र्याला कळले नाही याचे वाईट वाटते. आता कुठला कुत्रा पोलिस शोधत आहेत, याची माहिती अजून मिळालेली नाही, पण मी माहिती घेतो, असे विजय वडेट्टीवार म्हणाले. कुत्रा हा प्रामाणिक प्राणी असतो, मात्र या प्रामाणिक कुत्र्याने का असा राग धरला? यासंदर्भात खरंतर एसआयटी वैगरे लावून चौकशी केली पाहिजे, असे म्हणत विजय वडेट्टीवार यांनी उपरोधिक टोला लगावला आहे.

हे ही वाचा : संभाजी भिडे प्रतिक्रिया देण्याच्या लायकीची माणसं आहेत का ? शरद पवार संतापले

जितेंद्र आव्हाडांनी काय टोला लगावला?

या घटनेवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही भाष्य केले. माझ्या शहरातही कुत्रे खूप वाढले आहेत. आता कुणाला चावल्यानंतर ते सापडतील ते माहिती नाही. कुत्रा कुणाला चावल्याशिवाय, तोही महत्त्वाच्या माणसाला चावल्याशिवाय कुत्रे काही उचलले जात नाहीत. आता महत्त्वाच्या माणसाला ते चावावेत, अशी आपण देवाकडे प्रार्थना करूयात, म्हणजे सर्वसामान्यांना न्याय मिळेल. या सरकारमध्ये कुत्राही मोठ्या व्यक्तीला चावला तर पकडला जातो. सरकारची कार्य करण्याची पद्धत चांगली आहे, असा टोला जितेंद्र आव्हाड यांनी लगावला.

हा खटला फास्टट्रकमध्ये चालवा- मिटकरी

आमदार अमोल मिटकरी यांनी संभाजी भिडे गुरुजी यांचं नावं न घेता त्यांच्यावर खोचक टीका केली आहे. त्यांना चावलेला कुत्रा वाघ्या तर नव्हता ना? असा प्रश्न मिटकरी यांनी उपस्थित केला आहे. तर कुत्रा चावल्याचा खटला फास्ट ट्रॅकवर चालला पाहिजे, असं देखील मिटकरी यांनी म्हंटलं आहे. कुत्रा चावतो म्हणजे काय? मोघलाई लागली आहे का? असा खोचक प्रश्न मिटकरी यांनी उपस्थित केला आहे.

संभाजी भिडे यांना सोमवारी सांगलीत कुत्रा चावला होता. त्यानंतर त्यावर विरोधकांकडून जोरदार टीका केली जात आहे. त्यातच आता अजित पवार यांच्या गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी देखील एक ट्विट करत भिडे यांच नाव न घेता त्यांच्यावर टीका केली आहे. त्यांना चावलेला कुत्रा 'वाघ्या' तर नव्हता ना? जो कोणी असेल त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे. खटला फास्टट्रॅकवर चालला पाहिजे. चावतो म्हणजे काय? मोघलाई लागली आहे का?' असा प्रश्न देखील मिटकरी यांनी ट्विटमधून उपस्थित केला आहे.

नेमके घडले काय?

संभाजी भिडे सोमवारी रात्री सांगली येथील आपल्या एका धारकऱ्याकडे जेवणासाठी गेले होते. जेवणाचा कार्यक्रम आटोपल्यानंतर ते आपल्या सहकाऱ्यांसोबत घरी परत येत होते. तेव्हा शहरातील माळी गल्ली भागात एका कुत्र्याने अचानक त्यांच्यावर हल्ला चढवत त्यांच्या डाव्या पायाचा चावा घेतला.

या अनपेक्षित घटनेमुळे भिडेंसह त्यांच्या सोबतचे कार्यकर्तेही काही क्षण गांगारून गेले. त्यानंतर लगेचच त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे त्यांच्यावर उपचार करण्यात आले.

संभाजी भिडेंना डॉक्टरकडून दोन इंजेक्शन देण्यात आली आहेत. सध्या संभाजी भिडेंची प्रकृती स्थिर असून डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे. संभाजी भिडेंना येत्या दोन दिवसात आणखी इंजेक्शन देण्यात येणार आहेत.

भटक्या कुत्र्यांना पकडण्याची मोहीम सुरू

दरम्यान, या घटनेनंतर या घटनेनंतर भटक्या कुत्र्यांचा प्रश्न ऐरणीवर आला. त्यानंतर सांगली महापालिका खडबडून जागी झाली आहे. महापालिकेने शहरातील विविध भागात मोकाट कुत्र्यांची धरपकड सुरू केली आहे. ज्या भागात संभाजी भिडे यांना कुत्र्याने चावा घेतला होता त्या परिसरात महापालिकेकडून कुत्रे पकडण्याची मोहीम राबवण्यात आली आहे.

कोण आहे संभाजी भिडे?

  • संभाजी भिडेंचा जन्म 10 जून 1933 रोजी सांगली, महाराष्ट्र येथे झाला. त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण सावित्रीबाई फुले विद्यापीठ, पुणे येथून झाले. संभाजी भिडे यांना पुणे, सांगली, कोल्हापूर, बेळगाव, मुंबई आणि सातारा येथील अनेक लोक मानतात आणि तेथे त्यांचे हजारो समर्थक आहेत.
  • 1980 च्या दशकात संभाजी भिडे यांनी 'शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान' या संस्थेच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे पुत्र संभाजी यांच्याविषयी शिकवायला सुरुवात केली.
  • स्वतःची संघटना स्थापन करण्यापूर्वी संभाजी भिडे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी (RSS) देखील संबंधित होते. संभाजी भिडे हे त्यांच्या साध्या जीवनशैलीसाठी ओळखले जातात आणि ते सहसा लोकल बस आणि सायकलने प्रवास करतात. तो कधीही पादत्राणे घालत नाही.
  • 2008 मध्ये संभाजी भिडे यांच्या समर्थकांनी हृतिक रोशनच्या 'जोधा अकबर' चित्रपटाच्या थिएटर शोमध्ये इतिहासाचे विकृतीकरण केल्यामुळे गोंधळ घातला होता. त्यानंतर महाराष्ट्र पोलिसांनी संभाजी भिडे यांना अटक केली होती.
  • भीमा कोरेगाव हिंसाचार - 1 जानेवारी 2018 रोजी पुण्याजवळ, एल्गार परिषदेने एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते, या संघटनेने बंदी घातलेल्या माओवादी 20 मार्क्सवादी संघटनेशी संबंधित आहे. भीमा कोरेगावची लढाई. कार्यक्रमात भडकाऊ भाषणांमुळे जमाव चिडला आणि हिंसाचाराचा अवलंब केला. या हिंसाचाराचे मुख्य आरोपी गौतम नवलखा, सुधा भारद्वाज, वरावरा राव, अरुण फरेरा यांना UAPA कायद्यांतर्गत अटक करण्यात आली होती.
  • भीमा कोरेगाव येथे जमलेल्या लोकांना हिंसाचारासाठी प्रवृत्त केल्याचा आणि भारतीय कम्युनिस्ट पार्टी (माओवादी) या प्रतिबंधित दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. दोन गटांमधील हाणामारीत एक नाव संभाजी भिडे यांचेही होते. 2 जानेवारी रोजी त्यांच्या आणि मिलिंद एकबोटे यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला होता.
  • ऑक्टोबर 2018 मध्ये, महाराष्ट्राच्या देवेंद्र फडणवीस सरकारने संभाजी भिडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांवरील गुन्हे मागे घेण्याचा निर्णय घेतल्याचे एका आरटीआयद्वारे उघड झाले.
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+