Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

पुष्पक एक्स्प्रेसला आग लागल्याची अफवा! प्रवाशांच्या उड्या; समोरुन येणाऱ्या रेल्वेने उडवले, 8 जण ठार!

Rumors of a fire in Pushpak Express : जळगाव-पाचोरा दरम्यान परधाडे गावाजवळ दुर्घटना घडल्याची प्रार्थमिक माहिती मिळाली आहे. रेल्वे बोगीला आग लागल्याच्या अफवेने जीव वाचवण्यासाठी प्रवाशांनी पुष्पक एक्सप्रेसमधून उड्या मारल्या. मात्र त्याचवेळी समोरून येणाऱ्या बंगळुरू एक्सप्रेसने अनेकांना उडवले आहे. या अपघातात अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. प्राथमिक माहितीनुसार या अपघातामध्ये 8 प्रवाशांचा मृत्यू झाला. मृत्यूचा आकडा वाढू शकतो असेही प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुष्पक एक्सप्रेसच्या गाडीच्या चाकातून ब्रेक दाबल्यामुळे चाकातून धुर आल्याने आगीची अफवा पसरून डब्यातील प्रवाशांनी घाबरुन रुळांवर उडी मारल्या. त्याच वेळी दुसऱ्या दिशेने येणाऱ्या भरधाव बंगळुरु एक्सप्रेसने प्रवाशांना चिरडले. परधाडे रेल्वे स्थानकाजवळ पुष्पक एक्सप्रेसच्या मोटरमनने ब्रेक दाबल्याने एक्सप्रेसच्या चाकांमधून आगीच्या ठिगण्या उडाल्या.

Pushpak Express fire rumours

35 ते 40 प्रवाशांनी एक्सप्रेसमधून मारल्या पटापट उड्या

दरम्यान, प्रवाशांमध्ये एक्सप्रेसला आग लागल्याची अफवा पसरली. या अफवेमुळे महिला मुलांमध्ये एकच गोंधळ उडाला. एक्सप्रेसमधील लोक हादरून गेले. आवाज आणि किंचाळ्या सुरू झाल्या. त्यामुळे 35 ते 40 प्रवाशांनी एक्सप्रेसमधून पटापट उड्या मारल्या.

Passengers of Pushpak Express were on the track when they met with an accident as Karnataka Express was passing through an adjacent track. We are on the spot. Additional SP, SP, Collector and everybody is on their way. We are coordinating with DRM and Railway officials. 8 ambulances reached the spot as per last available information, additional rescue vans of Railway and Railway ambulances are being rushed to the spot. Further details are awaited. As per the last report, 8 people have died...The numbers can rise...Administration is providing all possible help: Divisional Commissioner of Nashik Praveen Gedam to ANI

बंगळुरू एक्स्प्रेसने अनेकांना उडवले

या घटनेनंतर समोरून गाडी येते की नाही याची खातरजमाही त्यांनी केली नाही. तेवढ्यात समोरून बंगळुरू एक्सप्रेस आल्याने बंगळुरू एक्सप्रेसने उड्या मारणाऱ्यां अनेकांना चिरडलं. त्यात अनेकांचा मृत्यू झाला. तर अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. दरम्यान या दुर्घटनेची माहिती समजताच रेल्वे प्रशासन, पोलिस प्रशासन आणि बचाव पथकाने घटनास्थळी धाव घेतली. बचावकार्यासह रुग्णांना रुग्णालयात नेण्यात आले असून जखमींवर उपचार सुरु आहे. अद्याप प्रशासनाकडून या दुर्घटनेसंदर्भात ठोस माहिती समजलेली नाही.

यासंदर्भात एनआयने वृत्त दिले असून जळगाव जिल्ह्यात कर्नाटक एक्सप्रेस ट्रेनने पुष्पक एक्सप्रेसच्या प्रवाशांना धडक दिली. ट्रेनमध्ये आग लागल्याच्या संशयावरून प्रवासी त्यांच्या डब्याबाहेर होते. रेल्वे अधिकारी आणि इतर कर्मचारी घटनास्थळी पोहोचले आहेत. अधिक माहितीची प्रतीक्षा आहे असे या वृत्तात म्हटले आहे.

काय म्हणाले प्रशासन?

कर्नाटक एक्सप्रेस शेजारील ट्रॅकवरून जात असताना पुष्पक एक्सप्रेसचे प्रवासी ट्रॅकवर असताना हा अपघात झाला. "आम्ही घटनास्थळी आहोत, अतिरिक्त एसपी, एसपी, जिल्हाधिकारी आणि सर्वजण या घटनेसंदर्भात परिस्थितीवर नजर ठेवून आहेत. आम्ही डीआरएम आणि रेल्वे अधिकाऱ्यांशी समन्वय साधत आहोत. शेवटच्या उपलब्ध माहितीनुसार 8 रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचल्या आहेत, रेल्वे आणि रेल्वे रुग्णवाहिकांच्या अतिरिक्त बचाव व्हॅन घटनास्थळी पाठवल्या जात आहेत. अधिक माहितीची वाट पाहत आहे. शेवटच्या वृत्तानुसार, 8 जणांचा मृत्यू झाला आहे. ही संख्या वाढू शकते तसेच प्रशासन सर्वतोपरी मदत करत आहे, असे नाशिकचे विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम एएनआयला माहिती दिली.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+