Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

रोहीत पवारांची अण्णा हजारेंवर खोचक टिका; म्हणाले, ते आजारी असतील त्यामुळे...

Rohit Pawar's Comments on Anna Hazare- ईव्हीएमविरोधात पुण्यात ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांनी आंदोलन सुरु केले आहे. यावर प्रतिक्रीया देताना राष्ट्रवादीचे नवनिर्वाचित आमदार सोहित पवार यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना टोला लगावला आहे. भाजपचे सरकार आल्याने अण्णा हजारे सध्या आजारी असून ते आराम करत आहेत, असं म्हणत रोहीत पवारांनी त्यांना टोला लगावला.

Rohit Pawar

रोहीत पवारांची ईव्हीएला विरोध

महायुतीला मिळालेल्या यशानंतर महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांनी ईव्हीएमला विरोध केला. तसाच विरोध रोहीत पवारांनीही केला. ईव्हीएममध्ये गोंधळ असू शकतो, असं त्यांनी सांगितलं. बाबा आढाव यांच्यासारखे ज्येष्ठ कार्यकर्ते लोकशाही वाचावी म्हणून हे आंदोलन करत आहेत, असंही रोहीत पवारांनी स्पष्ट केलं.

मुख्यमंत्रीपदाबाबत वक्तव्य

रोहीत पवार पुढे म्हणाले की, भाजपचाच मुख्यमंत्री होईल हे आता स्पष्ट झालं आहे. दुसरीकडे अजित पवार भाजपला अडचणीत आणत असतील तर एकनाथ शिंदे यांची चांदी होईल. दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनी जर भाजपला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला तर अजित पवार गटाची चांदी होईल. त्यामुळे या दोघांनाही आता भाजपचंच ऐकावं लागेल. त्याच्याशिवाय या दोन्हींना महायुतीत दुसरा पर्याय नाही. भाजप जे देईल, ते या दोघांनाही मान्य करावं लागेल, असा टोलाही रोहीत पवार यांनी लगावला.

अण्णा हजारेंवर टिका

ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव हे ईव्हीएम विरोधात पुण्यात आंदोलन करत आहेत. याबाबत प्रतिक्रिया देताना रोहीत पवार यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना टोला लगावला. ते म्हणाले, "बाबा आढाव यांच्यासारखे खरे सामाजिक कार्यकर्ते लोकशाही वाचावी म्हणून आंदोलन करत आहे. मात्र दुसरीकडे भाजपचे सरकार आल्यानं जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आंदोलन करत नाहीत. कदाचित ते आजारी असतील म्हणून आराम करत असतील." रोहित पवार यांच्या आजारीपणाच्या टिकेवर अण्णा हजारे यांच्याकडून काय प्रतिक्रिया येते ते पाहणे मनोरंजक ठरणार आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+