आता आहे का हिंमत? रोहीत पवारांनी बावनकुळेंचा 'तो' आदेशच दाखवला! DCP कृष्णा प्रकरणानंतर राजकारण तापलं
Rohit Pawar showed order regarding illegal mining of Bawankule : सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील कुर्डू गावात बेकायदेशीर मुरुम उपसा करणाऱ्यावर कारवाई करणाऱ्या पोलिस उपअधिक्षक तथा सनदी अधिकारी अंजली कृष्णा यांच्यावर 'दादागिरी' करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता, खुद्द राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कृष्णा यांना फोनवर खडे बोल सुनावले होते. यावरुन विरोधकांनी अजित पवार आणि महायुती सरकारवर टीकेची झोड उठवली.

तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते तथा आमदार रोहीत पवार यांनीही यावरुन जोरदार टीका केली होती, दरम्यान महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना त्यांनी काही सवाल केले आहेत. यासंदर्भात रोहीत पवारांनी पोस्ट टाकत चंद्रशेखर बावनकुळे यांच्याच एका आदेशाची आठवण करुन दिली.
रोहीत पवारांनी त्यांच्या पोस्टमध्ये परतूर (जि. जालना) विधानसभा मतदारसंघाचे आमदार बबनराव लोणीकर यांनी विधानसभेत केलेल्या प्रश्नाचा आणि त्यावरील कार्यवाहीचा संदर्भ दिला आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांनी अवैध उत्खनन करणाऱ्या धनदांडग्यांना कसा कोट्यवधींचा दंड माफ केला आणि त्यांचे जप्त साहित्य परत करण्याचे कसे आदेश दिले याची पोलखोलही रोहीत पवारांनी केली आहे.
रोहीत पवारांनी आदेशच केला पोस्ट
चंद्रशेखर बावनकुळेंना लिहिलेल्या पोस्टमध्ये रोहीत पवारांनी म्हटले की, गावातील लोक पाणंद किंवा गावातील रस्ते यासाठी मुरुम काढतात तेव्हा त्यांच्यावर कारवाई करता आणि धनदांडग्यांना सोडता असा आरोप केला आहे. या संदर्भातील एक आदेश रोहीत पवारांनी त्यांच्या एक्स या हँडलवर पोस्ट केला आहे.
रोहीत पवारांची पोस्ट जशाच्या तशी देत आहोत...
आदरणीय बावनकुळे साहेब,
मी कधीच पुराव्याशिवाय बोलत नाही...
हा घ्या पुरावा ...
तुमच्याच पक्षाचे आमदार मा.बबनराव लोणीकर यांनी 11 जुलै 2025 रोजी विधानसभेत उपस्थित केलेल्या प्रश्नाला तुम्ही स्वतः महसूल मंत्री म्हणून उत्तर दिले आहे....
दिलेले उत्तर आणि प्रश्न तुम्हीच बघा, तुम्ही केवळ दंडच माफ केला नाही तर जप्त केलेले साहित्यदेखील परत करण्याचे आदेश दिले होते हे विसरलात का?
एकंदरीतच यावरून असे दिसून येते की, गावातील लोक जेव्हा पाणंद रस्ते किंवा गावातील रस्ते यासाठी मुरूम काढतात तेंव्हा तुम्ही त्यांच्यावर कारवाई करता पण दुसरीकडे धनदांडग्यांनी अवैध उत्खनन केलं असतानाही कोट्यवधींचा दंड माफ करता...
हेच का तुमचं सर्वसामान्यांचं सरकार?
राहिला प्रश्न राजकीय संन्यासाचा तर आम्ही तुम्हाला राजकीय संन्यास घ्या म्हणत नाही फक्त जनतेच्या प्रश्नाचे उत्तर द्या..
आहे का हिंमत?
आदरणीय बावनकुळे साहेब,
— Rohit Pawar (@RRPSpeaks) September 8, 2025
मी कधीच पुराव्याशिवाय बोलत नाही...
हा घ्या पुरावा ...
तुमच्याच पक्षाचे आमदार मा.बबनराव लोणीकर यांनी 11 जुलै 2025 रोजी विधानसभेत उपस्थित केलेल्या प्रश्नाला तुम्ही स्वतः महसूल मंत्री म्हणून उत्तर दिले आहे....
दिलेले उत्तर आणि प्रश्न तुम्हीच बघा, तुम्ही… https://t.co/m1o6HcdzkC pic.twitter.com/qrSdQdEzPa












Click it and Unblock the Notifications