Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

राष्ट्रवादीत 'जयंत पर्व' संपले, शशिकांत पर्व येताच रोहित पवारांची लागली लॉटरी, मिळाही 'ही'मोठी संधी!

rohit pawar Latest Marathi News : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) पक्षात मोठ्या संघटनात्मक बदलांना सुरुवात झाली आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी मंगळवारी (15 जुलै, 2025) पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर, आता युवा नेते आमदार रोहित पवार यांच्याकडे मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

खासदार सुप्रिया सुळे यांनी 'X' समाजमाध्यमावर पोस्ट करून याबाबतची घोषणा केली आहे, ज्यामुळे पक्षाच्या आगामी वाटचालीची दिशा स्पष्ट झाली आहे.

दुसरीकडे, रोहित पवार यांच्या नियुक्तीनंतर राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा देखील होत आहे, जयंत पर्व संपले अन् शशिकांत शिंदे पर्व येताच रोहित पवारांना मोठ्या पदाची संधी मिळाल्याची चर्चा देखील होऊ लागली आहे.

rohit pawar

रोहित पवारांना कोणती मिळाली जबाबदारी?

सुप्रिया सुळे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, "राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार' पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस तसेच सर्व फ्रंटल आणि सेलच्या प्रभारीपदी आमदार रोहित पवार यांची निवड करण्यात आली आहे." या निवडीमुळे रोहित पवारांना पक्षाच्या राज्यस्तरीय संघटनेत महत्त्वपूर्ण स्थान मिळाले आहे, जे पक्ष बांधणी आणि धोरणात्मक निर्णयात त्यांची भूमिका अधिक महत्त्वाची बनवेल.

सुप्रिया सुळे यांनी पुढे म्हटले की, "रोहित यांच्या नेतृत्वाखाली पक्षाची संघटनात्मक बांधणी आणखी मजबूत होईल याची खात्री आहे." त्यांनी रोहित पवारांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छाही दिल्या.

जयंत पाटील पायउतार होताच रोहित पवारांना संधी

गेल्या २५ वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सक्रिय असलेले जयंत पाटील यांनी अखेर आपल्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याने अनेक तर्कवितर्क लावले जात होते. त्यानंतर पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी लगेचच पक्षाच्या नव्या प्रदेशाध्यक्षांची घोषणा केली. जयंत पाटील प्रदेशाध्यक्ष असेपर्यंत रोहित पवारांना कोणतीही मोठी पक्षाची जबाबदारी दिली गेली नव्हती, कारण या दोघांमध्ये अनेकदा विविध विषयांवरून मतभेद होते अशी चर्चा होती. जयंत पाटील यांच्या पायउतार होताच, रोहित पवारांना मिळालेली ही मोठी संधी राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनली आहे.

सुप्रिया सुळेंनी व्यक्त केला विश्वास

सुप्रिया सुळे यांनी रोहित पवारांना शुभेच्छा देताना त्यांच्यावरील विश्वास अधिक स्पष्ट केला. त्या म्हणाल्या, "स्व. यशवंतराव चव्हाण साहेब आणि आदरणीय पवार साहेब यांच्या विचारांचा वस्तुपाठ डोळ्यांसमोर ठेवून ते (रोहित पवार) काम करीत आहेत.

नूतन प्रांताध्यक्ष शशिकांत जी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्याची शिव फुले शाहू आंबेडकर ही वैचारिक चौकट अधिक भक्कम करण्यासाठी ते सदैव कार्यरत राहतील हा विश्वास आहे." या बदलामुळे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) पक्षात युवा नेतृत्वाला अधिक संधी मिळत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. रोहित पवार यांच्या नव्या भूमिकेमुळे पक्षाची संघटनात्मक बांधणी कशी मजबूत होते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+