उत्तराची महाराष्ट्र वाट पाहतोय.! 'त्या' प्रकरणाचा पर्दाफाश करणारच, रोहित पवारांचे बावनकुळेंना आव्हान
Rohit Pawar challenges Chandrashekhar Bawankule : राज्यात आयपीएस अंजली कृष्णा यांना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिलेल्या वागणुकीनंतर यानिमित्ताने मुरुम चोरी, दंड माफीचे प्रकरण रोहीत पवारांनी उचलून धरले आहे. यानिमित्ताने त्यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना सवाल करत कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. "रोज कापूसकोंड्याची गोष्ट काय सांगता, रोहित पवार जी ! या वक्तव्यावर रोहीत पवारांनी महसूल मंत्र्यांना पुन्हा एकदा प्रत्युत्तर दिले आहे आणि या प्रकरणाची पोलखोल विधीमंडळ अधिवेशनात करणार हे सांगत प्रत्युत्तर दिले आहे.

रोहीत पवारांनी बावनकुळेंना आज काय प्रत्युत्तर दिले?
रोहीत पवारांनी एक्सवर पोस्ट केली त्यानुसार, "आदरणीय बावनकुळेजी, मी आपलीच कागदपत्रे आपणास पुरावे म्हणून दिली आणि अत्यंत साधे सरळ सोपे प्रश्न विचारले, आपण उत्तरे देण्याचा प्रयत्न केला पण प्रत्येक उत्तरानंतर आपण अजून खोलात रुतत गेलात त्यामध्ये माझी काय चूक? मी दिलेले पुरावे आणि आपली उत्तरे बघता कापूसकोंड्याची गोष्ट कोण सांगतंय हे महाराष्ट्राला वेगळे सांगण्याची गरज नाही.
आदरणीय बावनकुळे साहेब,
— Rohit Pawar (@RRPSpeaks) September 11, 2025
मी आपलीच कागदपत्रे आपणास पुरावे म्हणून दिली आणि अत्यंत साधे सरळ सोपे प्रश्न विचारले, आपण उत्तरे देण्याचा प्रयत्न केला पण प्रत्येक उत्तरानंतर आपण अजून खोलात रुतत गेलात त्यामध्ये माझी काय चूक? मी दिलेले पुरावे आणि आपली उत्तरे बघता कापूसकोंड्याची गोष्ट कोण… https://t.co/6PkT05ZVbZ pic.twitter.com/bXeya5hGKQ
या कंपनीला डिस्काऊंट दिल्याचा रोहीत पवारांचा आरोप
रोहीत पवारांनी एक्सवर पोस्टमध्ये म्हणतात, "एकीकडे एखाद्या गावकऱ्याने घर बांधकामासाठी थोडी वाळू किंवा मुरूम घेतला तर ट्रॅक्टर जमा होतो, रस्त्यावर भाजीपाला विकला किंवा फेरीवाला काही विकत असेल तर साहित्य जप्त केले जाते, चुकून नो पार्किंगमध्ये गाडी लागली तर ७८६ चा दंड आणि मागचे एक चलन भरल्याशिवाय गाडी भेटत नाही, साधी पाणीपट्टी किंवा वीजबिल थकले तरी कनेक्शन कट केले जाते. परंतु दुसरीकडे मेघा इंजिनिअरिंग सारख्या कंपनीला कोट्यवधींच्या दंडात ९९ % डिस्काउंट ची बंपर ऑफर दिली जाते ...नियम तोडले तर दंड केलाच पाहिजे, परंतु सर्वसामान्यांना दंड आणि बॉण्डवाल्यांना माफी हे योग्य आहे का ?"
{embed-poll}
'छुपी दंड माफीच' - रोहीत पवार
रोहीत पवारांनी एक्सवर पोस्टमध्ये म्हणतात, "स्थगितीच्या नावाने डिस्काउंट देत वसुली थांबवायची याला स्थगिती नाही तर 'छुपी दंड माफीच' म्हणावी लागेल. मेघा इंजिनिअरिंगला दिलेली डिस्काउंट ऑफर बघता मेघा इंजिनिअरिंग आणि आपल्या पक्षाचा काय बॉण्ड आहे हे देखील यानिमित्ताने महाराष्ट्राला पून्हा एकदा कळून चुकले आहे."
बाँड प्रकरणाचा पर्दाफाश करणार- रोहीत पवार
रोहीत पवारांनी एक्सवर पोस्टमध्ये म्हणतात, " विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात चर्चा तर आम्ही घडवून आपल्या पक्षाचा आणि मेघा इंजिनिअरिंगचा बॉण्ड प्रकरणाचा पर्दाफाश आम्ही करणारच आहोत .... विधानसभेत नक्कीच भेटूया ... परंतु, तूर्तास आपण या प्रकरणावर मेघा इंजिनिअरिंगच्या 95 कोटीच्या दंडाबाबत महसूलमंत्री म्हणून काय कारवाई करणार आहात, आधीच्या महसूलमंत्र्यांनी दिलेली स्थगिती उठवून दंड वसूल करणार आहात का ? मेघा इंजिनिअरिंगच्या सातारा जिल्ह्यातील 105 कोटीच्या दंडमाफीचे दुसरे प्रकरण आपणास दिले आहे, त्यावर आपण काय कारवाई करणार आहात ? विधानसभेच्या अधिवेशनाची वाट न बघता आपण त्वरित कारवाई करणार का? या प्रश्नांच्या उत्तरांची मी एकटा नाही तर संपूर्ण महाराष्ट्र वाट पाहत आहे..."
काय म्हणाले होते बावनकुळे?
आमदार रोहित पवार यांनी "मी एका कंपनीला ९० कोटी रुपयांचा दंड माफ केला" असा आरोप केला. त्यांनी हा आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा, असा पलटवार राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला होता.
रोहीत पवारांनी काय दाखवला पुरावा
दरम्यान महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उत्तराला प्रत्युत्तर देताना रोहीत पवार म्हणाले की, गावातील लोक पाणंद किंवा गावातील रस्ते यासाठी मुरुम काढतात तेव्हा त्यांच्यावर कारवाई करता आणि धनदांडग्यांना सोडता असा आरोप केला आहे. या संदर्भातील बावनकुळेंनी दिलेला एक आदेश रोहीत पवारांनी त्यांच्या एक्स या हँडलवर पोस्ट केला व हा घ्या पुरावा असे म्हटले आहे. तसेच राहिला प्रश्न राजकीय संन्यासाचा तर आम्ही तुम्हाला राजकीय संन्यास घ्या म्हणत नाही फक्त जनतेच्या प्रश्नाचे उत्तर द्या. आहे का हिंमत? असे म्हणत त्यांनी चॅलेंज दिले होते.
त्यानंतर बावनकुळेंचे उत्तर काय?
रोहीत पवारांना उत्तर देताना मंत्री बावनकुळेंनी "रोज कापूसकोंड्याची गोष्ट काय सांगता, रोहित पवार जी !! तुम्ही खरोखर या विषयाबद्दल गंभीर असाल तर सभागृहात या; उत्तर देतो. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात चर्चा घडवा. सभागृहात प्रश्न मांडा." असे म्हटले आहे. त्यावर रोहीत पवारांनी आज एक्सवर पोस्ट करत दुसरा पुरावा दाखवला, त्यानंतर बावनकुळे यांना "विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात चर्चा तर आम्ही घडवून आपल्या पक्षाचा आणि मेघा इंजिनिअरिंगचा बॉण्ड प्रकरणाचा पर्दाफाश आम्ही करणारच आहोत .... विधानसभेत नक्कीच भेटूया ... "अशा शब्दात त्यांनी प्रत्युत्तर दिले.












Click it and Unblock the Notifications