रिल्स बनवणं तरुणीला पडलं महागात, पाय घसरून 300 फूट खोल दरीत कोसळल्याने दुर्दैवी मृत्यू!
मुंबई - पावसाळा सुरू झाला की सर्वत्र निसर्गातील पर्यटन स्थळं खुली होतात, आणि हीच पर्यटन स्थळं प्रत्येकाला आपल्याकडे खेचण्याची भुरळ घालतात. मात्र, याच स्थळांना भेटी देण्यासाठी काही अतिउत्साही तरुण तरुणी आपल्या जीवाची परवा न करता तेथील परीस्थितीचा अंदाज सुध्दा लक्षात न घेता स्वतःचा जीव धोक्यात घालतात.
माणगाव तालुक्यातील कुंभे जलविद्युत प्रकल्प असलेल्या धबधबा परीसरात मंगळवारी घडला. व्यवसायाने चार्टर्ड अकाऊंटंट असलेली आणि सोशल मीडियावर सोशल मीडिया इन्फ्लुएंसर म्हणून प्रसिद्ध असलेल्या अन्वीला आपला जीव गमवाला लागला आहे.

सोशल मीडियातून तिने रील स्टार म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली होती. मुंबईच्या माटुंगावरुन ही तरुणी आपल्या 6 मित्रांसोबत पावसाळी सहलीसाठी या भागात फिरण्यासाठी आली, मात्र दुर्दैवाने तिची ही सहल शेवटची ठरली.
रायगडमध्ये पावसाळी पर्यटनाचा दहावा बळी
पावसाळी पर्यटनाचा रायगडमध्ये आतापर्यंतचा हा दहावा बळी आहे. आनवी संजय कामदार (वय 27) असं या मृत तरुणीचं नावं असून ती मुंबईतील माटुंगा येथील रहिवासी होती. माटुंगा येथून पाच ते सहा जण पावसाळी पर्यटनासाठी रायगडमध्ये आले होते.
रिल्स बनवताना पाय घसरून कोसळली दरीत..
आनवी ही माणगाव परीसरात असणाऱ्या कुंभे जलविद्युत परीसरातील एका टेकडीवर रिल बनवत होती, मोबाईलमध्ये रिल शूट करत असताना तिचा तेथून अचानक तोल गेला आणि ती 250 ते 300 फूट खोल दरीत कोसळली. याची माहिती तिच्या मित्रांनी जवळील माणगाव पोलीस स्थानकात दिल्यानंतर माणगावचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निवृत्ती बोराडे यांच्यासह त्यांची बचाव कार्याची टीम घटनास्थळी दाखल झाली.
मोठ्या प्रयत्नांनी मृतदेह बाहेर काढला
आनवीच्या अकाली निधनाने तिच्या मित्रपरिवारात शोककळा पसरली असून तिच्या अपघाती मृत्यूमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. तर आनवीच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहेमोठ्या प्रयत्नांनी तिचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.
व्यवसायाने सीए आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर
मुंबईत राहणाऱ्या आनवीने डेलॉईटसारख्या मोठया कंपनीसोबत काम केलं होतं. इन्स्टाग्रामवर स्वतःची ओळख सांगताना तिने ट्रॅव्हल आणि लाईफस्टाईल विषयातील डिजिटल क्रिएटर अशी केली होती. प्रवास, टिप्स, कॅफे, आलिशान जागा यांची डिटेक्टिव्ह असं स्वतःचं रसभरीत वर्णनही आनवीने स्वतःच्या इन्स्टाग्राम अकाऊण्टवर केलेलं. तिचे दोन लाख 60 हजारांहून अधिक इन्स्टा फॉलोअर्स आहेत. जवळपास 2800 पोस्ट आणि रील्समधून तिने प्रेक्षकांसाठी देश-विदेशातील पर्यटनाचं जणू एक दालनच खुलं केलं होतं.












Click it and Unblock the Notifications