Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Mumbai Rain: राज्यात आज पुन्हा पाऊस तांडव करणार! मुंबई, पुण्याला रेड अलर्ट; विदर्भालाही पाऊस झोडपणार

Red Alert for Mumbai Pune Heavy rains likely in Maharashtra today : मुंबईसह, कोकण, विदर्भ आणि मराठवाड्यासह विदर्भातही आज काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. रायगडसह मुंबई-ठाण्याला हवामान विभागात मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडणार आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्कता बाळगावी असे आवाहन हवामान विभागाने कले आहे.

Red Alert for Mumbai Pune

पश्चिम, मध्य आणि लगतच्या वायव्य बंगालच्या उपसागरावर आणि उत्तर, आंध्र प्रदेश दक्षिण ओळीच्या ओडिसाच्या किनाऱ्यावर असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचे रूपांतर आज ठळक कमी दाबाच्या क्षेत्रामध्ये झाले आहे तसेच समुद्रसपाटीवर दक्षिण कोकण ते उत्तर केरळपट्टी समांतर एक वाऱ्याची द्रोणीय रेषा जात आहे. त्यामुळे आज महाराष्ट्रातील बहुतांश भागात याचा परिणाम जाणवत असून पाऊस पडण्याची शक्यता आहे.

'या' 7 जिल्ह्यांना आज रेड अलर्ट

आज संपूर्ण राज्यात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे, आज ठाणे, मुंबई, रायगड, पुणे व सातारा जिल्ह्याच्या घाट विभागात पाऊस पडण्याची शक्यता आहे. पालघर व नाशिक जिल्ह्याच्या घाट विभागात काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार तर तुरळक ठिकाणी अत्यंत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे, त्यामुळे या जिल्ह्यांना रेड अलर्ट दिला आहे.

आज 4 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

आज सिंधुदुर्ग जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जाहीर केला आहे. तसेच रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूरच्या घाट विभागात तुरळक ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. गडचिरोली जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे, त्यामुळे या सर्व जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे.

विदर्भातील सर्व जिल्ह्यांना येलो अलर्ट

विदर्भात आज पासून पुढील तीन दिवस तूरळक ठिकाणी मेघगर्जनेसह हलका ते मध्यम स्वरूपाच्या पाऊस पडण्याची शक्यता आहे, त्यामुळे विदर्भातील सर्व जिल्ह्यांना येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे.

पुण्यात 'या' भागासाठी रेड अलर्ट घोषित

पुणे हवामान विभागाने पुणे व परिसरातील हवामानाचा अंदाज दिला त्यानुसार, आज पुण्यात आकाश सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे व मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुणे जिल्ह्याच्या घाट विभागात काही ठिकाणी खूप जोरदार ते मुसळधार तर तुरळक ठिकाणी अत्यंत जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे घाट विभागाला रेड अलर्ट दिला आहे.

हेही वाचा : मुंबईत एवढा पाऊस का पडतोय? जाणून घ्या कारणं.. हवामान विभागाची मोठी अपडेट! 'या' भागात पुरांचा धोका

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+