Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

उद्योगपती रतन टाटा यांचे निधन, वयाच्या 86 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, PM मोदींकडून शोक व्यक्त

Ratan Tata passed away : देशातील सर्वात नामांकित उद्योगसंस्था असलेल्या टाटा समूहाचे मानद अध्यक्ष रतन नवल टाटा (86 वर्षे) यांची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून चिंताजनक होती. दरम्यान त्यांचे निधन झाल्याचे वृत्त समोर आले आहे.

त्यांच्यावर बीच कॅंडी रुग्णालयात आयसीयूमध्ये उपचार सुरू होते. रतन टाटा यांच्या निधनाबाबत अद्याप टाटा समूहाच्या वतीने कोणतेही वृत्त देण्यात आलेले नाही. परंतु हर्ष गोयंका यांनी रतन टाटा यांच्या वृत्ताबाबत माहिती ट्विट करत माहिती दिली.

दरम्यान, यापूर्वी म्हणजे 7 ऑक्टोबर रोजी काही माध्यमांच्या अहवालात दावा करण्यात आला होता की, रतन टाटा ब्रीच कँडी हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागात (ICU) दाखल आहेत. त्यांचा रक्तदाब बराच कमी झाला होता. माध्यमांच्या या बातमीनंतर खुद्द रतन टाटा यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत म्हटले की, 'मी ठीक आहे आणि माझ्या वृद्धत्वामुळे मी रुटीन चेकअपसाठी हॉस्पिटलमध्ये गेलो होतो. काळजी करण्यासारखे कोणतेही कारण नाही, असे म्हटले होते. त्यानंतर त्यांना आज सायंकाळी पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

RATAN TATA

रतन टाटा 1990 ते 2012 या काळात टाटा समूहाचे अध्यक्ष

28 डिसेंबर 1937 रोजी जन्मलेले रतन टाटा हे टाटा समूहाचे संस्थापक जमशेदजी टाटा यांचे पणतू आहेत. ते 1990 ते 2012 पर्यंत समूहाचे अध्यक्ष आणि ऑक्टोबर 2016 ते फेब्रुवारी 2017 पर्यंत हंगामी अध्यक्ष होते. रतन टाटा समूहाच्या चॅरिटेबल ट्रस्टचे प्रमुख आहेत.

रतन यांनी आपला वारसा एका नव्या उंचीवर नेऊन ठेवला आहे. एअर इंडियाचा त्यांनी आपल्या साम्राज्यात समावेश केला. परदेशी कंपनी फोर्डने लँड्रोव्हर आणि जग्वार या लक्झरी कार ब्रँडचाही पोर्टफोलिओमध्ये समावेश केला आहे.

रतन टाटा यांना पद्मविभूषणने सन्मान

त्यांच्याबद्दल अधिक सांगायचे झाले तर त्यांच्या नेतृत्वाखाली टाटा समूहाने अनेक महत्त्वाची कामगिरी केली. त्यांना 2000 मध्ये पद्मभूषण आणि 2008 मध्ये पद्मविभूषण हा देशाचा दुसरा सर्वोच्च नागरी सन्मान देण्यात आला. त्यांनी कॉर्नेल विद्यापीठातून आर्किटेक्चरमध्ये पदवी प्राप्त केली आणि जेआरडी टाटा यांच्यानंतर 1991 मध्ये टाटा सन्सचे अध्यक्ष बनले. त्यांच्या कार्यमग्न स्वभावामुळे टाटा समूहाचे नाव देशात मोठ्या सन्मानाने घेतले जाते. विशेष म्हणजे सामाजिक क्षेत्रात देखील त्यांच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबविले जात आहेत.

रतन टाटा यांचा जीवनप्रवास घ्या जाणून?

रतन टाटा यांचा जन्म 28 डिसेंबर 1937 रोजी झाला होता. एक सामान्य कर्मचारी म्हणून 1961-62 मध्ये रुजू झाले. त्यानंतर जेआरडी टाटांनी त्यांना टाटा ग्रुपचं चेअरमनपद सोपवलं. चेअरमनपद हाती घेतल्यानंतर समूहातील सर्व कंपन्यांमध्ये टाटांची स्वतःची हिस्सेदारी वाढवली. 1998मध्ये संपूर्णपणे भारतीय बनावटीची 'इंडिका' कार टाटा मोटर्सने बनवली. त्यानिमित्ताने रतन टाटा यांचं स्वप्न पूर्ण झालं होतं. एका कुटुंबाला मोटारसायकलवर प्रवास करताना पाहून स्वस्तात कार बनवण्याची कल्पनाही त्यांना सुचली.

टाटांच्या मार्गदर्शनात 2008मध्ये रतन टाटा मोटर्सने टाटा नॅनो बाजारात आणली. त्यांनी 2012मध्ये टाटा सामूहाच्या चेयरमनपदाचा राजीनामा दिली आणि सायरस मेस्त्रीकडे पदभार दिला. मेस्त्रीसोबतच्या वादानंतर 2016 मध्ये पुन्हा वर्षभर टाटा समूहाच्या चेयरमनपदी ते आले. नटराजन चंद्रशेखरन हे सध्या टाटा समूहाचे चेयरमन आहेत. रतन टाटांच्या पश्चात धाकटे भाऊ जिम्मी टाटा, नोएल टाटा हे दोन भाऊ आहेत. तर नोएल टाटा यांना लेह टाटा, माया टाटा, नेव्हिल टाटा ही 3 मुले आहेत.

More From
Prev
Next
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+