Ratan Tata : रतन टाटांची प्रकृती बिघडली ही अफवा! एक्सवर पोस्ट, म्हणाले - चिंतेचे कारण नाही मी चांगला
Ratan Tata : सुप्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांच्या प्रकृतीबद्दल जे वृत्त आले त्या अफवा असल्याचे समोर आले आहे. त्यांची प्रकृती चांगली असून केवळ वय आणि रेग्युलर चेकअपचा भाग म्हणून ते वैद्यकीय तपासणी करत असल्याचे स्पष्ट केले आहे. अफवांवर विश्वास ठेवू नका आणि चुकीची माहिती पसरवणाऱ्यांपासून माध्यमांनी दूर राहावे असे आवाहनही रतन टाटा यांनी केले आहे.
रतन टाटांची पोस्ट
रतन टाटा यांनी एक पोस्ट केली असून "मला माझ्या आरोग्याबाबत अलीकडील अफवांची माहिती समजली आहे. हे दावे निराधार आहेत हे मी सांगत आहे. माझे वय आणि संबंधित वैद्यकीय परिस्थितीमुळे मी सध्या वैद्यकीय तपासणी करत आहे. चिंतेचे कारण नाही. मी चांगला आहे आणि विनंती करतो की सार्वजनिक आणि माध्यमांनी चुकीची माहिती पसरवण्यापासून दूर राहावे."

ही पसरली होती अफवा टाटांनी केले खंडन
रतन टाटा यांना लो बीपीचा त्रास झाला आणि त्यामुळे त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते असे वृत्त काही माध्यमांनी दिले होते. हे वृत्त सोशल मीडियावरही पसरले त्यानंतर हे वृ्त्त निराधार असल्याचे समोर आले आहे. चुकीचे वृत्त माध्यमांत येत असल्याचे निदर्शनास येतात रतन टाटा यांच्यामार्फत एक एक्सवर पोस्ट करण्यात आली आणि त्यातून रतन टाटा यांची प्रकृती चांगली असल्याचे स्पष्ट करत निराधार वृत्ताबद्दल पोस्टही करण्यात आली आहे.
रतन टाटा हे प्रसिद्ध भारतीय उद्योगपती असून त्यांचे कर्तृत्व मोठे आहे. देशातील बहुतांश सर्व पुरस्कारही त्यांना प्राप्त आहेत. त्यांचे सामाजिक कार्यही खूप मोठे आहे. टाटा यांनी भारतीय उद्योग जगतात अढळस्थान प्राप्त केले असून त्यांच्या प्रकृतीविषयी आज अफवा सुरु होत्या त्या अफवांना आता पुर्णविराम मिळाला आहे. टाटा यांच्याकडून ते चांगले असल्याचे स्पष्ट करण्यात आले असून आता या चर्चा थांबल्या आहेत.












Click it and Unblock the Notifications