माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या मुलीच्या कारला अपघात, संजना जाधव थोडक्यात बचावल्या
छत्रपती संभाजीनगर शहारात राहणाऱ्या माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांची मुलगी संजना जाधव यांच्या वाहनाचा अपघात झाला आहे. धुळे सोलापूर महामार्गावरील चाळीसगाव तालुक्यात रांजणगाव येथे अपघात झाल्याची माहिती मिळत आहे.

सुदैवाने या अपघात दानवे यांची कन्या संजना जाधव व चालक हे बालंबाल बचावले. पिकअप चालकाने जाधव यांच्या कारला जोरदार धडक दिली. संजना जाधव या माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या पत्नी होत. तसेच त्या कन्नड विधानसभा मतदारसंघातून इच्छुक उमेदवार असल्याची चर्चा आहे.
जावई विरुद्ध सासरे असा वाद
हर्षवर्धन जाधव, संजना जाधव आणि रावसाहेब दानवे यांचे नातेसंबंध एव्हाना संपूर्ण महाराष्ट्राला माहिती झालेले आहे. हर्षवर्धन जाधव हे रावसाहेब दानवे यांचे जावई, तर संजना जाधव यांचे पती. हर्षवर्धन जाधव यांनी अनेक वेळा रावसाहेब दानवे यांच्यावर बेछूट आरोप केलेले आहेत. त्यामुळे सासरे-जावई यांच्यातील वाद सर्वदूर पोहोचला आहे.
नागपूरमध्ये हिट अँड रनची घटना
नागपूरच्या केळवद पोलीस ठाण्याच्या हद्दीत नागपूर छिंदवाडा महामार्गावर हिट अँड रन ची घटना सोमवारी उघडकीस आली. अपघातात दुचाकीवर स्वार असलेल्या तिघांचा मृत्यू झाला आहे. अज्ञात वाहनाने दुचाकीस्वारांना धडक दिल्याने यात तिघांचा मृत्यू झाला. तर अज्ञात वाहनचालकाने पळ काढला. सोमवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास ही घटना घडली
बारामती हादरली, विद्यार्थ्याचा खून
बारामतीतील तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात इयत्ता बारावीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा खून झाला आहे. वार करणारा आरोपी हा त्याच्याच महाविद्यालायतील आहे. दोघेही एकाच वर्गात शिकत असल्याची प्राथमिक माहिती आहे. महाविद्यालयाच्या आवारातच हा प्रकार घडला. आरोपी युवकाने कोयत्याने वार केल्याने यात एक युवक जागीच ठार झाला.












Click it and Unblock the Notifications