राज्यसभा निवडणूक 2026 : राजकीय खलबतं सुरू! भाजप 5 जागांसाठी ताकद लावणार; 'या' दिग्गजांची नावे चर्चेत
Rajya Sabha Election 2026 Maharashtra BJP Eyes 5 Seats : केंद्रीय निवडणूक आयोगाने १८ फेब्रुवारी २०२६ रोजी राज्यसभेच्या निवडणुकीची घोषणा केल्यानंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापले आहे. महाराष्ट्रातून राज्यसभेवर निवडून द्यायच्या ७ जागांसाठी आता सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये मोर्चेबांधनीला सुरुवात झाली आहे. विधानसभेतील पक्षीय संख्याबळ पाहता, भाजप या सातपैकी पाच जागा जिंकण्यासाठी पूर्ण ताकद लावण्याच्या तयारीत आहे.

भाजपची रणनीती
भाजपने पाच जागांवर दावा केला असून, त्यामध्ये मित्रपक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) चे नेते रामदास आठवले यांच्या जागेचाही समावेश आहे. भाजपमध्ये इच्छुकांची संख्या मोठी असली तरी, अनेक वर्षांपासून पक्षाशी एकनिष्ठ राहिलेल्या नेत्यांना संधी मिळावी, असा एक मोठा प्रवाह पक्षात पाहायला मिळत आहे.
ही नावे आहेत चर्चेत
राज्यसभेच्या उमेदवारीसाठी भाजप आणि मित्रपक्षांकडून काही महत्त्वाची नावे सध्या राजकीय वर्तुळात चर्चेत आहेत.
- विनोद तावडे: भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस.
- रामदास आठवले: रिपाई (आठवले गट) प्रमुख.
- विजया रहाटकर: भाजपच्या ज्येष्ठ नेत्या.
- भागवत कराड: माजी केंद्रीय राज्यमंत्री.
- धैर्यशील पाटील: भाजप नेते.
निवडणुकीचा महत्त्वाचा कार्यक्रम
- अर्ज भरण्याची शेवटची तारीख: ५ मार्च २०२६.
- अर्जांची छाननी: ६ मार्च २०२६.
- अर्ज मागे घेण्याची मुदत: ९ मार्च २०२६.
- मतदान: १६ मार्च २०२६ (सकाळी ९ ते दुपारी ४).
- निकाल: १६ मार्च २०२६ (सायंकाळी ५ वाजेनंतर मतमोजणी).
निवृत्त होणारे सदस्य
महाराष्ट्रातून खालील ७ सदस्यांचा कार्यकाळ संपत असल्याने या जागा रिक्त होत आहेत.
- १. शरद पवार (राष्ट्रवादी काँग्रेस - श.प. गट).
- २. रामदास आठवले (रिपाई).
- ३. फौजिया खान (राष्ट्रवादी काँग्रेस - श.प. गट).
- ४. रजनी पाटील (काँग्रेस).
- ५. प्रियांका चतुर्वेदी (शिवसेना - उबाठा गट).
- ६. धैर्यशील पाटील (भाजप).
- ७. भागवत कराड (भाजप).
राज्यसभेच्या कोणत्या राज्यात किती जागांवर निवडणूक?
एकूण ३७ जागांपैकी सर्वाधिक जागा महाराष्ट्रात (७) आहेत. त्याखालोखाल तामिळनाडू (६), पश्चिम बंगाल (५), बिहार (५), ओडिशा (४), आसाम (३), छत्तीसगड (२), हरियाणा (२), तेलंगणा (२) आणि हिमाचल प्रदेशातील एका जागेवर निवडणूक होणार आहे.
हेही वाचा : मोठी बातमी! राज्यसभा निवडणुकीचे बिगुल वाजले; 'या' दिवशी निवडणूक राज्यातील दिग्गजांची खुर्ची धोक्यात












Click it and Unblock the Notifications