राजन साळवी यांनी सांगितलं शिंदे गटात येण्याचं खरं कारण; म्हणाले, माझ्या पराभवाला...
शिवसेनेचे नेत राजन साळवी यांनी उद्धव ठाकरे गटाची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला. उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय मानल्या जाणाऱ्या राजन साळवी यांनी हा निर्णय घेतल्याने ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेच्या सगळ्या पदाचा राजीनामा देत राजन साळवी यांनी एकनाथ शिंदे हे आपल्या गुरुस्थानी असल्याचं म्हटलं आहे. शिवाय शिवसेना का सोडली याचं कारणही सांगितलं आहे.

काय म्हणाले साळवी?
आपल्या पक्षसोडण्याच्या प्रश्नावर साळवी म्हणाले. "माझ्या पराभवाला जी मंडळी कारणीभूत आहेत त्या सगळ्यांची माहिती, पुरावे मी उद्धव ठाकरे यांना दिले आहेत. त्यानंतर वाटलं आता थांबाव. पण मतदारसंघातील माणसं, त्यांचा विकास, जिल्ह्याचा विकास यासाठी मी पुन्हा उमेदीने उभं राहिलं पाहिजे, असं आग्रह कार्यकर्त्यांनी धरला. विकासाच्या दृष्टीने विचार करता एकनाथ शिंदे यांचं नेतृत्व महाराष्ट्राने स्वीकारलं आहे. त्यांच्या नेतृत्वात पुन्हा एकदा शिवसेना, धनुष्यबाण घेऊन लोकांमध्ये जाता येईल, असं मला वाटल्याचे राजन साळवी यांनी सांगितले.
काय होतं कारण?
विनायक राऊतांवर तुमची नाराजी आहे का, या प्रश्नावर साळवी म्हणाले, "विनायक राऊतांबद्दल नाराजी आहे. त्याची तक्रार मी उद्धव ठाकरेंकडे केली होती. पक्ष सोडण्याच्या निर्णयाप्रत मी त्यामुळेच आलो, असं साळवी यांनी स्पष्ट केलं. याशिवाय शिवसेना शिंदे गटातच का आलाय याबाबतही ते बोलले. ते म्हणाले, "महाराष्ट्रात सत्तेच्या अनुषंगाने भाजप, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस हे तीन पक्ष महत्त्वाचे आहेत. त्यामुळे कुठं जावं याबाबत आम्ही, पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी शांतपणे विचार केला. कार्यकर्त्यांच्या सूचनेनुसार वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे कुठे आहेत, धनुष्यबाण कुठे आहे? हा विचार केला. त्यानुसार हा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.
राऊतांना टोला
उदय सामंत यांना शह देण्यासाठी राजन साळवींना शिंदे गटाने घेतलंय असा टोला विनायक राऊत यांनी मारला होता. त्यावर बोलताना राजन साळवी म्हणाले की, "शह-काटशह असं काही नाहीय. हातात हात घालून शिवसेना वाढवण्यासाठी आम्ही काम करणार आहोत. 38 वर्ष राजन साळवीने शिवसेना पक्षप्रमुखांच्या आदेशाच पालन केलं आहे. त्यामुळे कोण काय म्हणतंय याकडे माझं लक्ष नाही.












Click it and Unblock the Notifications