Raj Thackeray : "बाप विकला गेला म्हणून.."- नाशिकमध्ये राज ठाकरेंची तुफानी फटकेबाजी; वाचा खास मुद्दे
Raj Thackeray Nashik Speech in marathi : नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत आज एक ऐतिहासिक क्षण पाहायला मिळाला. तब्बल २० वर्षांनंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकाच मंचावर आले आणि 'शिवशक्ती'च्या या जाहीर सभेतून राज ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर कडाडून प्रहार केला. "ज्या शहराने मला भरभरून दिलं, त्या शहराचा विकास उध्वस्त करणाऱ्यांना धडा शिकवा," असे भावनिक आणि आक्रमक आवाहन राज ठाकरे यांनी नाशिककरांना केले.
काल ९ जानेवारी २०२६ रोजी नाशिक येथे आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवशक्तीची अर्थात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा पार पडली. या सभेत राज ठाकरे यांचे भाषण झाले. राज ठाकरेंनी ही सभा गाजवली, या सभेत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपवर शरसंधान साधले.

'बाप विकला गेला, म्हणून विकास झाला नाही' - राज ठाकरे
आपल्या भाषणात राज ठाकरे यांनी मतदारांना पैशाच्या आमिषापासून सावध केले. ते म्हणाले, "उद्याची पिढी काय सांगेल? आमचा विकास झाला नाही कारण आमचा बाप विकला गेला! जर तुम्हाला उत्तम शहर घडवायचं असेल, तर छोट्या-मोठ्या भूलथापांना बळी पडू नका. पैशांपेक्षा शहराच्या भविष्याला प्राधान्य द्या."
भाषणातील धडाकेबाज मुद्दे
निवडणुकांच्या विलंबावर प्रश्नचिन्ह
गेल्या ४ वर्षांपासून निवडणुका का रखडल्या? असा सवाल करत त्यांनी प्रशासकीय गोंधळावर बोट ठेवले.
भाजपवर बोचरी टीका
१९५२ साली जनसंघ नावाने जन्माला आलेल्या पक्षाला २०२६ मध्ये पोरं (उमेदवार) भाड्याने घ्यावी लागत आहेत, हा जुन्या कार्यकर्त्यांचा अपमान असल्याची टीका त्यांनी केली.
भ्रष्टाचारमुक्त सत्ता
मनसेच्या २०१२-२०१७ या पाच वर्षांच्या सत्ताकाळात महापालिकेवर एकही भ्रष्टाचाराचा आरोप झाला नाही आणि ७०० कोटींचे कर्ज फेडून महापालिका कर्जमुक्त केली, याची आठवण त्यांनी करून दिली.
विकासकामांची आठवण
मुकणे धरणाची पाईपलाईन, अत्याधुनिक घंटागाडी, बोटॅनिकल गार्डन आणि गोदा पार्क यांसारख्या प्रकल्पांची सध्याच्या सत्ताधाऱ्यांनी दुरवस्था केल्याचा आरोप त्यांनी केला.
आश्वासनांची पोलखोल
देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या मेट्रो, आयटी पार्क आणि सेमी हायस्पीड रेल्वेच्या आश्वासनांचे काय झाले? असा खडा सवाल त्यांनी विचारला.
'१००' चा आकडा गाठण्याचा निर्धार
राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना स्पष्ट आदेश दिले आहेत. "येत्या १६ जानेवारीला निकालाच्या दिवशी नाशिकमध्ये शिवसेना (उबाठा) आणि मनसे या 'शिवशक्ती' युतीचे किमान १०० नगरसेवक निवडून आलेले मला पाहायचे आहेत," असे म्हणत त्यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला.
या सभेमुळे नाशिकच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता असून, राज-उद्धव यांच्या एकत्र येण्याने महापालिका निवडणुकीत रंगत वाढली आहे.
आज, ९ जानेवारी २०२६ रोजी नाशिक येथे आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवशक्तीची जाहीर सभा पार पडली. या सभेत माझे व शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धव ठाकरे यांचे भाषण झाले.
— Raj Thackeray (@RajThackeray) January 9, 2026
माझ्या भाषणातील प्रमुख मुद्दे पुढीलप्रमाणे होते
- ४ वर्षांपूर्वी ज्या निवडणुका होणं अपेक्षित होतं…












Click it and Unblock the Notifications