रस्त्यावरचे खड्डे बुजवायला पैसे नाही लाडक्या बहिणींसाठी कुठून पैसे आणणार? राज ठाकरेंची शिंदेंवर टीका
राज ठाकरे यांनी आज मनसेच्या मेळाव्यात लाडकी बहिण योजनेवर जोरदार टीका केली. रस्त्यावरचे खड्डे बुजवायला पैसे नाही लाडक्या बहिणींसाठी कुठून पैसे आणणार? असा सवाल करीत राज ठाकरेंची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.
काय म्हणाले राज ठाकरे?
म्हणाले, आमच्याकडे लाडकी बहिण आणि लाडका भाऊ..अहो आमच्याकडे जर दोन्ही बहिण-भाऊ एकत्र आले असते तर दोन्ही पक्ष टिकले असते. योजना कशाला हव्या त्यासाठी. बहिणीला दीड हजार देणार आहेत का पैसे राज्य सरकारकडे. रस्त्यावरचे खड्डे बुजवायला पैसे नाही कुठून पैसे आणणार.

इतक्या जागा लढवणार मनसे
राज ठाकरे म्हणाले, येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे लोक सत्तेत काहीही करुन बसवायचे आहेत. अनेक लोक हसतील पण काही हरकत नाही. ती गोष्ट घडणार म्हणजे घडणार. सर्वच जण आम्ही तयारीला लागलो आहोत. तुमच्यापर्यंत हे लोक येतील त्यामुळे युती होईल का नाही असा विचार मनात आणू नका. जवळपास सव्वा दोनशे तो अडीचशे जागा विधानसभा निवडणुकीसाठी लढवणार आहोत असेही राज ठाकरे म्हणाले.
..तरच तिकीट मिळेल
राज ठाकरे म्हणाले, मी एवढ्या जागा लढवणार म्हणून तुम्ही जयजयकार करु नका, मोठ्याने घोषणा दिल्या तरी तुमची उमेदवार म्हणून वर्णी लागेल असे समजू नका. सर्व गोष्टी पडताळल्यानंतरच उमेदवार ठरवणार असल्याचेही राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात स्पष्ट केले.
1 ऑगस्टनंतर महाराष्ट्र दौरा
राज ठाकरे म्हणाले, सर्वे जसा येईल त्यानुसार, मी 1 ऑगस्टपासून महाराष्ट्राचा दौरा सुरू करणार आहे. ज्यावेळी मी तिथे येईल त्यावेळी आपल्या सर्वांच्या भेटीगाठी होईलच. अजून कुणाच्या भेटीगाठी करायच्या ते सांगून माझ्या भेटी करुन द्या. पावसामुळे यावेळी मेळाव्यांची अनिश्चिततता आहे. 1 ऑगस्टनंतर दौऱ्यात भेटी होतील, हे सांगण्यासाठीच मी आज मेळावा घेतल्याचीही राज ठाकरे यांनी स्पष्ट केले.
विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागा
राज ठाकरे म्हणाले, सर्वेक्षण करणारे आगामी एक दोन दिवसांत येतील. त्यानुसार तुम्ही त्यांना योग्य माहिती द्या. त्यानुसार. तुम्ही पक्षाच्या निवडणुकीच्या तयारीला लागावे अशा सुचनाही राज ठाकरे यांनी आजच्या बैठकीत दिल्या. पावसामुळे मेळाव्याला येण्यास अडचण आली असेल तर दिलगिरी व्यक्त करतो असे म्हणत ढग माझ्या हातात नव्हते असा मिश्किल टोलाही त्यांनी लगावला.
(ही बातमी अपडेट होत आहे)












Click it and Unblock the Notifications