राज-उद्धव यांची एकत्र मुलाखत, "सत्तेत बसवलेली माणसं धन्याचं ऐकतात", ठाकरी शैलीत फटकारे, बघा ट्रेलर
Raj and Uddhav Thackeray's Interview : महाराष्ट्राच्या राजकारणात ज्या क्षणाची गेल्या २० वर्षांपासून वाट पाहिली जात होती, तो क्षण अखेर आला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना (उबाठा) प्रमुख उद्धव ठाकरे यांची संयुक्त 'महामुलाखत' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. खासदार संजय राऊत आणि ज्येष्ठ दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी ही मुलाखत घेतली असून, याचा धडाकेबाज ट्रेलर आज सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला.

ट्रेलरमधील महत्त्वाचे मुद्दे: 'भ्रष्टाचार आणि कन्फ्युजनची युती'
संजय राऊत यांनी 'एक्स'वर (ट्विटर) या मुलाखतीचा १ मिनिट ४० सेकंदांचा ट्रेलर पोस्ट केला आहे. यात दोन्ही नेत्यांनी अत्यंत आक्रमकपणे सध्याच्या राजकीय स्थितीवर भाष्य केले आहे.
राज्यकर्त्याचे प्रेम हे राज्यावर असले पाहिजे सत्तेवर असता कामा नये! ऐतिहासिक महामुलाखत... संजय राऊत आणि महेश मांजरेकर यांनी घेतलेली दणदणीत आणि खणखणीत मुलाखत उद्यापासून... भाग १ गुरुवारी ८ जानेवारी रोजी फक्त सामनावर @rautsanjay61 @OfficeofUT @RajThackeray pic.twitter.com/rHCvVwlvyT
— Saamana Online (@SaamanaOnline) January 7, 2026
बसवलेली माणसं आणि धनी
राज ठाकरे सत्ताधाऱ्यांवर टीका करताना म्हणाले, "ही सत्तेत बसवलेली माणसं आहेत, स्वबळावर बसलेला माणूस यात कुणीच नाही. आणि जो बसवलेला असतो, तो फक्त आपल्या धन्याचंच ऐकतो."
उद्धव ठाकरेंचा टोला
"राज्यकर्त्याचे प्रेम हे राज्यावर असायला हवे, केवळ सत्तेवर नाही," असे म्हणत उद्धव ठाकरेंनी सत्तालालसेवर निशाणा साधला. तर भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून राज ठाकरेंनी थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुनावले. "भ्रष्टाचाराच्या गोष्टी तर फडणवीसांनी करूच नयेत," असे राज या मुलाखतीत ठामपणे सांगताना दिसत आहेत.
पुणे आणि मुंबईच्या भविष्याबाबत चिंता
मुलाखतीत महेश मांजरेकर यांनी मुंबईच्या दुरवस्थेबद्दल प्रश्न विचारला, त्यावर राज ठाकरेंनी पुणेकरांनाही सावध केले. "मुंबई खराब व्हायला एक वेळ येईल, पण त्याआधी पुणे बरबाद होईल की काय अशी स्थिती आहे," अशी भीती त्यांनी व्यक्त केली. तसेच, राजकीय चष्म्यातून न बघता 'राज्य' म्हणून प्रश्नांकडे पाहणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले.
मुंबईकरांच्या वेदना आणि मतदारांचा राग
"मुंबईत काय हवंय हे तिथे जन्माला आल्याशिवाय कळणार नाही," असे सांगत राज ठाकरेंनी मतदारांनाही खडे बोल सुनावले. "लोकांनी आपला राग मतपेटीतून व्यक्त केला नाही, तर तक्रार कोणाकडे करणार? आमच्याकडे तक्रार करायला लोकांकडे मतं नाहीत," असा रोकठोक सवाल त्यांनी यावेळी केला. ही बहुप्रतीक्षित ऐतिहासिक मुलाखत गुरुवार, ८ जानेवारी २०२६ पासून भागांमध्ये प्रसारित होणार आहे. उद्या या महामुलाखतीचा पहिला भाग प्रसिद्ध होईल. ही
Raj and Uddhav Thackeray's Interview












Click it and Unblock the Notifications