अंदमानात मान्सून आला! महाराष्ट्रात आगमन कधी? 2 तासांत वादळी पावसाने पुण्याला झोडपलं! रस्ते जलमय
Rain News Monsoon has arrived in Andaman : मान्सून यंदा लवकरच म्हणजे आठवड्याआधीच अंदमानात दाखल झाला आहे. दक्षिण पश्चिम मान्सून आज 13 मे 2025 रोजी अंदमानात दाखल झाल्यानंतर निकोबार बेटांवर धो-धो पाऊस पडला. तर दुसरीकडे पुण्याला पावसाने चांगलेच झोडपले, अवघ्या दोन तासांत पावसाने पुण्यातील रस्ते जलमय झाले आहेत.

दक्षिण बंगालच्या उपसागरावर आणि दक्षिण अंदमानावर समुद्रावर नैऋत्य मान्सून अधिकृतरित्या पोहला आहे. यासंदर्भात भारतीय हवामान विभागानेही माहिती दिली आहे. यंदा नियोजित वेळेच्या एक आठवडाआधी मान्सून बंगालच्या उपसागरात दक्षिण दिशेने अंदमान आणि निकोबारच्या बेटावर पोहचला आहे.
🌈आनंदाची बातमी: हिरव्या रेषेसह येथे दाखवल्याप्रमाणे, #दक्षिण_पश्चिम_मान्सून आज, १३/०५/२०२५ रोजी #अंदमानात दाखल झाला आहे.☔
मान्सूनची उत्तर सीमा, 5°N/75°E, 5°N/80°E, 6°N/86°E, 8.5°N/90°E, Hut Bay, 13°N/95°E. and 16°N/98°E. या भागातून जाते.
IMD https://t.co/0tTJWPsiQm
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) May 13, 2025
🌈आनंदाची बातमी: हिरव्या रेषेसह येथे दाखवल्याप्रमाणे, #दक्षिण_पश्चिम_मान्सून आज, १३/०५/२०२५ रोजी #अंदमानात दाखल झाला आहे.☔
मान्सूनची उत्तर सीमा, 5°N/75°E, 5°N/80°E, 6°N/86°E, 8.5°N/90°E, Hut Bay, 13°N/95°E. and 16°N/98°E. या भागातून जाते.
IMD https://t.co/0tTJWPsiQm
निकोबार बेटावर मुसळधार पाऊस
प्राप्त माहितीनुसार, मागील चोवीस तासात निकोबार बेटावर अनेक ठिकाणी मध्यम आणि मुसळधार पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान, दक्षिण बंगालचा उपसागरस निकोबार बेटे व अंदमानच्या समुद्री भागात पश्चिमेकडून येणाऱ्या वाऱ्याची गती आणि खोली वाढलेली आहे.
साधारणतः मान्सून महाराष्ट्रात सात जूनला दाखल होतो. परंतु यंदा अंदामानमध्येच मान्सून आठ ते दहा दिवस आधी पोहचला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातही नियोजित वेळेआधी म्हणजे एक जून ते दोन जूनपर्यंत मान्सूनचे आगमन होईल मान्सून खासकरुन सर्वात आधी महाराष्ट्रात कोकण किनारपट्टीला धडकतो.
पुण्यात पावसाची धुंवाधार बॅटींग
गेल्या काही काळापासून महाराष्ट्रातील हवामान हे पावसाळी झाले आहे. त्यातच या काळात महाराष्ट्रावर ढगही दाटलेले दिसून आले. दरम्यान, आज महाराष्ट्रातील पुणे शहरात जोरदार सरी कोसळल्या. पावसाने धुंवाधार बॅटींग केली. यामुळे पुण्यात ऐनवेळी सर्वांचीच त्रेधातिरपीट उडाली.
कुठे कुठे पडला पाऊस?
पुण्यात वारसेड, औंध, बाणेर, कोथरुड, सिंहगड रोड, हडपसर आदी भागात चांगल्यास पावसाच्या सरी कोसळल्या, पावसाने केलेल्या धुंवाधार बँटींगमुळे या भागातील रस्त्यांचे तळे झाले होते. या पावसामुळे वाहतूक कोंडीही काही काळ झाली होती. दरम्यान महानगरपालिका प्रशासनाने उपाययोजना केली तर वाहतूक विभागाने कोंडी सोडवण्यासाठी पाऊले उचलले, त्यामुळे आता पुण्यातील वाहतूक सुरुळीत झाली आहे.
काय आहे हवामान अंदाज?
- आंध्र प्रदेश, कर्नाटकची किनारी भाग, अंतर्गत कर्नाटक, केरळ आणि माहे, मध्य महाराष्ट्र आणि तामिळनाडू आणि पुद्दुचेरी येथे काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
- अंदमान आणि निकोबार बेटे, अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर, मिझोरम आणि त्रिपुरा तसेच उप-हिमालयीन पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्ये काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
- आसाम आणि मेघालयात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
- अरुणाचल प्रदेश, कर्नाटकच्या किनारी भाग आणि लक्षद्वीपमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ होण्याची शक्यता आहे.
- छत्तीसगड, गुजरात, केरळ आणि माहे, कोकण आणि गोवा, नागालँड, मणिपूर, मिझोरम आणि त्रिपुरा, ओडिशा, राजस्थान, तामिळनाडू आणि पुद्दुचेरी, विदर्भ आणि पश्चिम बंगाल आणि सिक्कीम येथे काही ठिकाणी विजांसह वादळे आणि जोरदार वारे (ताशी 40-50 किमी वेगाने) होण्याची शक्यता आहे.
- आंध्र प्रदेश, आसाम आणि मेघालय, कर्नाटकच्या अंतर्गत भागात, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि तेलंगणामध्ये काही ठिकाणी विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यांसह (50-60 किमी प्रतितास वेगाने) वादळ होण्याची शक्यता आहे.
- तेलंगणात काही ठिकाणी गडगडाटी वादळे आणि गारपीट होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा : महाराष्ट्रात कुठे होणार पाऊस? आजचा हवामान अंदाज काय?
हेही वाचा : विदर्भात उष्णतेची लाट मराठवाडा-मध्य महाराष्ट्रात येलो अलर्ट, आज तुमच्या शहरात तापमान किती जाणून घ्या












Click it and Unblock the Notifications