विदर्भात उष्णतेची लाट मराठवाडा-मध्य महाराष्ट्रात येलो अलर्ट, आज तुमच्या शहरात तापमान किती जाणून घ्या
Maharashtra Temperature Updates : महाराष्ट्रातील तापमानात प्रचंड वाढ झाली असून उन्हाच्या झळा असह्य झाल्या आहेत. विदर्भात तर प्रखर उष्णता असून घराच्या बाहेर पडणेही धोक्याचे बनले आहे. अशा स्थितीत हवामान विभागाने विदर्भात उष्णतेची लाट तर उर्वरित महाराष्ट्रात येलो अलर्ट जारी केला आहे.

ब्रम्हपुरीत उन्हाच्या झळा, राज्यातील सर्वात जास्त तापमान
विदर्भात सध्या वातावरण फारच गरम असून ब्रम्हपुरी येथील तापमान तब्बल ४५.७ अंश सेल्सियस इतके आहे तर चंद्रपूर अकोला येथील तापमानही ४५ अंशापार गेले आहे. त्यामुळे विदर्भात उष्णतेची लाट आहे याचा अंदाजही येतो. विदर्भातील ब्रम्हपुरी येथे महाराष्ट्रातील सर्वाधिक तापमान नोंदवले गेले आहे. ब्रम्हपुरी येथे ४४.७ अंश सेल्सियस इतके तापमान आहे.
विदर्भात तापमानाचा कहर, पारा ४२ अंशापार
विदर्भातील सर्व जिल्ह्यातील तापमान चाळीशीपार तर आहेच पण अकोला, नागपूर, यवतमाळ, चंद्रपूर आणि अमरावती जिल्ह्यात तापमान ४४ अंशावर पोहचले आहे. अशातच तापमान वाढत असताना घराबाहेर गरज असेल तरच पडावे अशा सूचनाही स्थानिक प्रशासनाकडून दिल्या जात आहेत.
मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रात येलो अलर्ट
मराठवाड्यातील काही जिल्ह्यात तापमानाचा पारा विदर्भाच्या खालोखाल आहे. येथील परभणी जिल्ह्यात ४३.४. नांदेड आणि बीड येथे ४३.१ अंश सेल्सियस इतके तापमान आहे. त्यामुळे विदर्भानंतर मराठवाड्यात उन्हाचा कडाका आहे. तर मध्य महाराष्ट्रातही काही ठिकाणी तापमानाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे.
मराठवाड्यातील कमाल तापमानात वाढ
मराठवाड्यात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी किंचित वाढ झाली आहे उर्वरित राज्यात कमाल तापमानात सरासरीच्या जवळपास होते.
राज्यातील प्रमुख शहरांमधील तापमान किती आहे (अंश सेल्सिअसमध्ये)
राज्यातील प्रमुख शहरांमध्ये तापमान पाहता मुूंबतई दिलासादायक तापमान आहे तर पुण्यात पारा चाळीशीत आहे नागपूरमध्ये तर तापमानाने कहर केल्याचे दिसून येत आहे. मुंबई (कुलाबा) ३४.३, सांताक्रूझ ३३.७ अलिबाग ३५.७, रत्नागिरी ३३.५, पणजी (गोवा) ३५.०, डहाणू ३५.०, पुणे ४०.५. लोहगाव ४३.२, अहिल्यानगर जळगाव ४३.२. कोल्हापूर ३४.३. महाबळेश्वर ३२.६. मालेगाव ४३.०, नाशिक ३८.३. सांगली ३५.८, सातारा ४०.३. सोलापूर ४२.३. धाराशिव ४२.०. छत्रपती संभाजीनगर ४१.४, परभणी ४३.४. नांदेड बीड ४३.१, अकोला ४५.२. अमरावती ४४.२, बुलढाणा ४०.६, ब्रह्मपुरी ४५.९, चंद्रपूर ४५.०. गोंदिया ४२.६, नागपूर ४४.४, वाशिम ४३ २ वर्धा ४४० यवतमाळ ४४.४ येथे अंश सेल्सियस इतके तापमान आहे.












Click it and Unblock the Notifications