Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

पावसामुळे रेल्वे वाहतूक खोळंबली, मदत व पुनर्वसन मंत्री निघाले रेल्वे ट्रॅकवरून पायी

Mumbai: गेल्या २४ तासांपासून मुंबईत जोरदार पाऊस सुरु आहे. मुंबईत रविवारी रात्री 1 ते सोमवारी सकाळी 7 वाजेपर्यंत 300 मिमी पावसाची नोंद झाली. मुंबईतल्या मुसळधार पावसाचा फटका काही आमदारांनाही बसला.

अधिवेशनासाठी जाणारे कॅबिनेट मंत्री अनिल पाटील यांच्यासह सात आमदार हावडा मेलमध्ये अडकले असल्याचे समजते. रेल्वे ट्रॅकवर पाणी भरल्यामुळे कुर्ला येथे हावडा मेल मागच्या दीड तासापासून अडकलेली आहे. अडकलेल्या आमदारांमध्ये आ. संजय गायकवाड , आ. अमोल मिटकरी, आ. जोगेंद्र कवाडे आदींचा समावेश आहे.

mumbai hevay rain

पुरात अडकलेल्या 56 जणांना वाचवले

रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर जास्त आहे. राजापूर येथील पुरात अडकलेल्या 56 नागरिकांना पोलिसांनी वाचवल्याचे समजते. बाजारपेठेत शिरलेल्या पुराच्या पाण्यात हे नागरीक अडकले होते. बोटीच्या सहाय्याने अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढले. रविवारी राजापूर बाजारपेठेत पाच ते सहा फुटांपर्यंत पुराचं पाणी होते.

सलग पाच तास हे रेस्क्यू ऑपरेशन सुरु होते. दरम्यान, चिपळूणमधील वाशिष्टी नदीच्या पाणीपातळीत घट झाली आहे. आज सकाळपासून पावसाची उघडीप दिल्यामुळे पाणी कमी होत आहे. मात्र हवामान खात्याकडून आजही ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

'या' धरणाचे दरवाजे उघडले

पूर्णा नदीच्या खोऱ्यात गेल्या १२ तासांत सरासरी ७०.४ मिमी पाऊस झाला. हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने तीन दिवसांपूर्वी बंद करण्यात आलेला धरणाचा विसर्ग पुन्हा सुरु करण्यात आला आहे.

आज अकलूजचे धरणाचे 4 दरवाजे 1 मीटरने उघडून धरणातून 7628 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग तापी नदी पात्रात विसर्ग करण्यात आला आहे.

मुंबईत 300 मिमी पाऊस

मुंबईत रविवारी रात्रीपासून मुसळधार झालेल्या पावसाचा फटका मुंबईच्या लाईफलाइनला देखील बसला. मुंबईतील हार्बर लाईनची सेवा ठप्प झाली. मुंबईत रविवारी रात्री 1 ते सोमवारी सकाळी 7 वाजेपर्यंत 300 मिमी पावसाची नोंद झाली.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणारी जलद लोकल घाटकोपर आणि विद्याविहारमध्ये थांबली आहे. यामुळे या ट्रेनमधील प्रवासी आता ट्रेनमधून उतरून रेल्वे रुळातून प्रवास करत आहेत.

मालाड भुयारी मार्गाची अवस्था अत्यंत वाईट झाली असून पाण्यात एका बाजूला कार अडकली आहे तर दुसऱ्या बाजूला मोठा टेम्पो अडकला आहे. सध्या पाऊस थांबला असून, भुयारी मार्गातील पाणी हळूहळू कमी होत आहे.

'या' परीक्षा पुढे ढकलल्या

मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस कोसळत आहे. यामुळे मुंबई विद्यापीठाच्या CDOE च्या आज पहिल्या सत्रातील परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. सकाळी ११ ते २ या वेळेतील या परीक्षा होणार होत्या. 13 जुलै रोजी ही परीक्षा त्याच वेळी होणार असल्याचे विद्यापीठातर्फे जाहीर करण्यात आले आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+