Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

कोल्हापूरात राहुल गांधींचे भव्यदिव्य स्वागत, छत्रपतींच्या बहुशस्त्रधारी पुतळ्याचे केले अनावरण

Rahul Gandhi : शुक्रवारचा दौरा रद्द झाल्यानंतर आज सकाळीच काँग्रेसचे नेते व लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे कोल्हापूरात दाखल झाले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, खा. श्रीमंत शाहू महाराज छत्रपती, विधान परिषद सदस्य सतेज पाटील यांच्यासह प्रदेश काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांनी राहुल गांधी यांचे कोल्हापूर विमानतळावर भव्य स्वागत केले.

Rahul Gandhi

छत्रपतींच्या पुतळ्याचे झाले अनावरण

विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या विमानात बिघाड झाला होता. त्यामुळे कालचा नियोजित कोल्हापूर दौरा रद्द करण्यात आला होता. आज शनिवारी सकाळीच ते कोल्हापूर विमानतळावर दाखल झाले. कसबा बावडा येथील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे अनावर सकाळी १० वाजता झाले. आ. सतेज पाटील यांच्या संकल्पनेतून हा बहुशस्त्रधारी भव्य पुतळा साकारण्यात आला आहे.

कोल्हापूरात जल्लोषात स्वागत

राहुल गांधी यांचे विमानतळावर आगमन झाल्यावर प्रदेश काँग्रेसच्या नेत्यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन भव्य स्वागत केले. भगवा चौकात उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण त्यांच्या हस्ते झाले. त्यावेळी मोठी गर्दी होती. ठिकठिकाणी राहुल गांधी यांचे स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमानंतर राहुल गांधी शाहू समाधी स्थळास भेट देणार आहेत. आ. सतेज पाटील, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी एक्स या ट्विटर हॅण्डेलवरुन या कार्यक्रमाचे फोटो व्हायरल केले आहेत.

केंद्रातील नेत्यांचा महाराष्ट्र दौरा वाढला

विधानसभा निवडणूकीच्यापूर्वी पंतप्रधान मोदी आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हा महाराष्ट्र दौरा महत्त्वपूर्ण मानला जात आहे. केंद्रीय मंत्री अमित शाह हे सुद्धा दोन वेळा दोन दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावर येऊन गेले आहेत. त्यामुळे राज्याच्या निवडणूकीसाठी केंद्रामध्ये सुद्धा जोरदार तयारी आणि खलबतं सुरु असल्याचं स्पष्ट आहे. महायुती व महाविकास आघाडीचा आज प्रचाराचा धुराळा उडणार असल्याचे स्पष्ट आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+