Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

पुणे पुन्हा हादरलं ! बापदेव घाटात महिलेवर तिघांकडून सामूहिक बलात्कार

पुण्यात स्कूल बसमध्ये दोन चिमुकलीवर मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना ताजी असतानाचा पुन्हा एकदा धक्कादायक बातमी समोर आली आहे. मित्रासोबत फिरायला गेलेल्या एका महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. पुण्यातील बोपदेव घाटात ही सामूहिक बलात्कारची घटना उघडकीस आली आहे.

दरम्यान पीडित महिलेवर तातडीने रुग्णालयात दाखल केले असून तिच्यावर उपचार सुरु आहेत. या प्रकरणी कोंढवा पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत. पिडीत महिला ही मित्रासोबत फिरण्यासाठी बापदेव घाटात गेली होती. त्यावेळी तिच्यावर तिघांनी सामूहिक बलात्कार केला आहे. या घटनेमुळे राज्यात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.

Pune gang rape

सुप्रिया सुळेंचा संताप

शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या घटनेवरुन संताप व्यक्त करत एक टिट्ट केलं आहे. "अतिशय संतापजनक! पुण्यात हे काय सुरू आहे? बोपदेव घाटात एका मुलीवर सामूहिक अत्याचार झाल्याची घटना उजेडात आली आहे. पुणे आणि राज्यभरात सातत्याने महिलांवरील अत्याचारांच्या घटना वाढतच आहेत.

या घटनांना पायबंद घालण्यासाठी गृहखाते काहीही करताना दिसत नाही. दुर्दैवाने महाराष्ट्र महिलांसाठी सुरक्षित राहीलेला नाही, असे म्हणावे लागत आहे. शासनाने सदर घटनेतील आरोपींना गजाआड करुन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी." अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

धावत्या स्कूल बसमध्ये दोन सहा वर्षीय मुलींवर लैंगिक अत्याचार

धावत्या स्कूल बसमध्ये दोन सहा वर्षीय मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची घृणास्पद घटना समोर आली. त्यामुळे मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. बदलापूरच्या शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर अत्याचार करण्यात आला होता. त्यावरून वातावरण तापलेले असतानाच काल पुण्यात असाच धक्कादायक प्रकार उघडकीस आला. पुण्यात स्कूल बसमध्ये दोन चिमुकल्या मुलींवर ड्रायव्हरकडून अत्याचारची घटना काल उघडकीस आली होती. पुण्यातील वानवडी परिसरात ही धक्कादायक घटना घडली होती.

वानवडी पोलीस स्थानकात अत्याचार प्रकरणी 45 वर्षीय आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा नराधम आरोपी सहा वर्षांच्या दोन चिमुरड्यावर गेल्या चार दिवसांपासून बसध्ये अत्याचार करत होता, अशी माहिती समोर आली आहे.

सदर आरोपी एका नामांकित शाळेतील विद्यार्थ्यांना बसमधून शाळेत सोडतो. दोन्ही पीडित मुली या त्याच्या बसमधील पुढच्या सीटवर बसायच्या. गेल्या चार दिवसांपासून तो ड्रायव्हर दोन्ही मुलींशी अश्लील कृत्य करत त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करत होता. घडलेल्या घटनेबद्दल कुणालाही सांगायचं नाही, अशी धमकीही त्या नराधमाने मुलींना दिली होती.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+