Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

प्रशिक्षणार्थी IAS पूजा खेडकरच्या अडचणी वाढल्या, वाहतूक पोलिसांनी पाठवली नोटीस

मुंबई : प्रशिणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर हिच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. पूजा खेडकर हिला पुणे वाहतूक पोलिसांनी नोटीस पाठवली आहे. पूजाने आपल्या ऑडी कारवर लाल-निळ्या रंगाचा दिवा आणि व्हीआयपी नंबर प्लेट लावली होती. तसेच तिच्या या खाजगी कारवर 'महाराष्ट्र शासन' असं लिहीण्यात आल्याचं आढळून आले होते.

IAS Pooja Khedkar

आता सदर खाजगी वाहनावर मोटार वाहन कायदा कलम 177 अन्वये कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. यापूर्वीही वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या या वाहनावर कारवाई करण्यात आल्याचे दिसून येत आहे. आता वाहतूक पोलिसांनी पुजाला नोटीस पाठवली असून, पुढील कायदेशीर तपासणीसाठी सदर खाजगी वाहन आवश्यक कागदपत्रांसह चतुश्रृंगी परिवहन विभागाकडे सादर करण्याचे आदेश दिले आहेत. पुणे शहर, चतुश्रृंगी वाहतूक विभाग वरिष्ठ पोलीस निरीक्षक शफील पठाण यांनी याबाबत माहिती दिली आहे.

21,000 रुपयांचा दंड

दरम्यान, पुणे पोलिसांनी गुरुवारी पूजा खेडकरवर कारवाई सुरू केली आणि तिच्या वैयक्तिक ऑडी कारवर लाल दिवा वापरल्याबद्दल तिची चौकशी करणार असल्याचे सांगितले. पोलीस सूत्रांनी पुढे सांगितले की, प्रशिणार्थी आयएएस अधिकाऱ्यावर मोटार वाहन नियम कायद्यांतर्गत कारवाई केली जाईल. खेडकर यांनी वापरलेल्या कारला वाहतुकीचे नियम न पाळल्याबद्दल 21 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

एकल-सदस्यीय समितीची स्थापना

केंद्राने प्रशिणार्थी IAS अधिकारी पूजा खेडकर यांच्यावर झालेल्या आरोपाची चौकशी करण्यासाठी एक सदस्यीय समिती स्थापन केली आहे. प्रशिणार्थी अधिकारी म्हणून तिची नियुक्ती आणि वर्तणूक यावरून ती वादात सापडली आहे. वरिष्ठ अतिरिक्त सचिव स्तरावरील अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखालील या समितीला पुढील दोन आठवड्यांत खेडकर यांच्यावर झालेल्या आरोपाची पडताळून पाहण्याचे काम देण्यात आले आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+