Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

मोठी बातमी : आरोपीने एकदा नाही, तर दोनदा केला अत्याचार; स्वारगेट रेप केसमध्ये धक्कादायक माहिती समोर

स्वारगेट एसटी डेपो मध्ये आज पहाटे साडेपाचच्या सुमारास एका २६ वर्षीय तरुणीवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली. आता याच प्रकरणात एक मोठी माहिती समोर आली आहे. वैद्यकीय तपासात या पीडित तरुणीचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचं वैद्यकीय अहवालातून स्पष्ट झालं आहे. संध्याकाळी ससुन रुग्णालयाने हा वैद्यकीय अहवाल पोलिसांना दिला. यामध्ये आरोपीने पिडीतेवर एकदा नाही, तर दोनवेळा लैंगिक अत्याचार केल्याची माहिती देण्यात आली आहे.

Swargate Rape Case

काय आहे मेडिकल अहवालात?

आरोपी दत्तात्रय गाडे याने तरुणीला फसवून एका बसमध्ये नेलं. तेथे गाडीचा दरवाजा लाँक करुन त्याने तिला जिवे मारण्याची धमकी देत अत्याचार केला. या तरुणीवर सध्या उपचार सुरु आहेत. त्यातच तिचा मेडिकल रिपोर्ट आज सायंकाळी हाती आला. त्यात या तरुणीवर लैंगिक अत्याचार झाल्याचे उघड झाले. विशेष म्हणजे आरोपी गाडे याने एकदा नाही तर दोनदा या तरुणीवर अत्याचार केल्याचे त्यातून उघड झाल्याचे वृत्त महाराष्ट्र टाईम्सने दिले आहे.

२३ गार्डचं निलंबन

या प्रकरणात आणखी एक बातमी समोर आली आहे. या प्रकारानंतर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मोठी कारवाई करत स्वारगेट डेपोमधील 23 सुरक्षा रक्षकांचे तत्काळ निलंबन केलं आहे. तसेच डेपो मॅनेजर आणि वाहतूक नियंत्रक यांची चौकशी करुन एका आठवड्यात चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहे. 23 सुरक्षा रक्षकांचे तत्काळ निलंबन करून उद्यापासून त्यांच्या जागी स्वारगेट डेपोमध्ये नवीन सुरक्षारक्षक कामावर रुजू करण्याचे आदेश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहे.

वाहक असल्याचे सांगत फसवले

आरोपी गाडे हा पीडित तरुणीला ताई- ताई म्हणत होता. त्याच्यावर विश्वास ठेवून तरुणी बस जवळ आली. बस बंद असल्याने तू टॉर्च लावून आतमध्ये जा. हीच बस काही वेळात फलटणला निघेल, असं आरोपीने तरुणीला सांगितलं. त्यानंतर तरुणी बसमध्ये चढली आणि तिच्या पाठीमागे बसमध्ये आरोपी दत्तात्रय गाडे देखील चढला आणि बसचे दार बंद केले. त्यानंतर तरुणीला जीवे मारण्याची धमकी देत तिच्यावर बलात्कार केला आणि तिकडून पळ काढला. तरुणी घाबरल्याने तिच्यासोबत घडलेला प्रकार कोणाला सांगितलं नाही. त्यानंतर फलटणला जाण्यासाठी तरुणी दुसऱ्या बसमध्ये बसली आणि तिने हा संपूर्ण प्रकार घरच्यांना सांगितला.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+