Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

पुण्यात नाकाबंदी दरम्यान कारमध्ये 5 कोटी रक्कम सापडली, संजय राऊत यांचे सत्ताधारी पक्षावर गंभीर आरोप

पुणे : राज्यात विधानसभा निवडणूक आता चांगलीच चर्चेत येत आहे. काल (ता. २१) पुणे जिल्ह्यात भोरजवळ सत्ताधारी पक्षाशी नेत्याशी संबंधित असलेल्या कारमध्ये अंदाजे पाच कोटीची रक्कम सापडली आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी ठिक- ठिकाणी नाकाबंदी सुरू केली आहे. या नाकाबंदी दरम्यान एका गाडीत अंदाजे पाच कोटी रुपयांची रक्कम पोलिसांना आढळून आली आहे. राज्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता असताना कारमध्ये ऐवढी मोठी रक्कम सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहीतीनुसार पुणे ग्रामीण पोलिसांनी खेड-शिवापूर टोलनाक्यावर नाकाबंदी लावण्यात आली होती.दरम्यान पुणे सातारा रोडने एका वाहनातून रोख रक्कम येणार असल्याची माहिती पुणे ग्रामीण पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार राजगड पोलिसांनी सोमवारी दुपारपासून खेड-शिवापूर टोल नाक्यावर नाकाबंदी लावण्यात आली होती. दरम्यान सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास एक संशयित कार टोल नाक्यावर आली.

Pune Innova Car

राजगड पोलिसांनी या वाहनाची तपासणी केली असता त्यात मोठी रोख रक्कम असल्याचे आढळून आली. यावेळी पोलिसांनी संबंधित वाहन पोलिस चौकीला आणून त्यातील रोख रक्कम ताब्यात घेतली आहे. तसेच या वाहनातील चार जणांनाही चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. पुणे ग्रामीण पोलिस या सर्व प्रकरणात गुन्हा दाखल करण्याचे काम करत आहेत. निवडणूक आयोगाचे अधिकारी देखील याठिकाणी दाखल झाले आहेत.

मिळालेल्या माहीतीनुसार ही कार सांगोल्याची असल्याची बोललं जातं आहे. नलवडे नावाच्या व्यक्तीची ही कार असल्याची माहिती आहे. या कारमध्ये नक्की किती रक्कम आहे, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र अंदाजे पाच कोटी रुपयाची रक्कम असल्याचं बोललं जात आहे. तसेच ऐवढी मोठी रक्कम कोणाची आहे आणि कुठे चालवली होती, या बाबत आता पोलिस तपास करत आहेत. ही कार सत्ताधारी पक्षाच्या एका मोठ्या नेत्यांच्या संबंधित व्यक्तीची आहे.

संजय राऊत यांचे अप्रत्यक्षपणे शहाजी पाटलांवर गंभीर आरोप

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आपल्या सोशल मिडिया या एक्स प्लेटफॉर्मवर म्हटलं आहे की, मिंधे टोळीतील एका आमदाराच्या गाडीत खेड शिवापूर टोल नाक्यावर 15 कोटी सापडले! हे आमदार कोण? काय झाडी...काय डोंगर...मिंधे यांनी निवडणुकीसाठी प्रत्येक उमेदवारास 75 कोटी पाठवले. 15कोटी चा हा पहिला हप्ता!काय बापू..किती हे खोके? असा सवाल ही संजय राऊत यांनी उपस्थितीत केला आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+